Monsoon Car Driving Tips : सध्या पावसामुळे सर्वत्र हिरवंगार आणि आल्हाददायक वातावरण आहे. आता कुठे वाढत्या तापमानापासून दिलासा मिळाला आहे. या मोसमाचा आनंद घेण्यासाठी अनेक जण सहल किंवा लाँग ड्राईव्हला जाण्याचा प्लॅन करतात. पावसाळ्यात रोड ड्रीपचा आनंद काही वेगळाच असतो. तुम्हीही पावसाळ्यात कारमधून बाहेर गेला असाल किंवा कुठे बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. काही टिप्स जाणून घ्या ज्याचा वापर करून तुम्ही सुरक्षित प्रवास करू शकता.


पावसाळ्यात गाडी चालवताना अनेक समस्या उद्भवतात. पाऊस आणि धुक्यामुळे दृष्यमानता कमी होते, त्यामुळे अनेक वेळा समोरचं काही दिसत नाही. तसेच पावसाळ्यात टायर स्लीप होऊन अपघात होण्याचा धोकाही वाढतो. अशा वेळी गाडी चालवताना काय काळजी घ्यावी, हे वाचा.


खिडक्या बंद ठेवा


पाऊस पडत असेल तर गाडीच्या खिडक्या बंद कराव्यात. पावसाच्या पाण्यामुळे विंडस्क्रीनवर धुकं पडत आणि बाहेरचं दृश्य स्पष्टपणे दिसत नाही. ही समस्या टाळण्यासाठी वायपरसोबतच डीफॉगर आणि एसी चालू ठेवावा. विंडस्क्रीन कधीही आतून नाहीतर बाहेरच्या बाजूने साफ ​​करू नये.


हेडलाईटचा वापर करा


अनेकदा मुसळधार पावसात गाडी चालवताना आपल्याला लांबच्या गोष्टी दिसत नाहीत, अशा वेळी हेडलाईट्सचा वापर करावा. हेडलाईट्समुळे तुम्हाला रस्त्यावरच स्पष्ट दिसण्यास मदत होईल आणि तुमची कार दूरहून इतरांनाही दिसेल. जर तुमच्या कारमध्ये DRL (डे टाईम रनिंग लाइट) असेल तर तुम्ही त्याचा वापर करा. रात्री हाय बीम वापरू नका.


योग्य बाजूने गाडी चालवा


अनेकदा आपण घाईगडबडीत चुकीच्या बाजूने म्हणजेच राँग वेने गाडी चालवतो. ही चूक केल्यास मुसळधार पावसामुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत आणि अपघात होण्याची शक्यता वाढतो. त्यामुळे तुम्ही योग्य बाजूने गाडी चालवा.


वेगावर नियंत्रण ठेवा


बर्‍याचदा मोसमाचा आनंद घेण्यासाठी आपण अतिशय वेगाने गाडी चालवतो, यामुळे वाहन घसरून अपघात होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच नेहमी वेगावर नियंत्रण ठेवा.


पाणी साचलेल्या सामसूम रस्त्यावर जाणं टाळा


पावसाळ्याच गाडी चालवताना घाई करणं किंवा शॉर्टकट घेणं टाळा. शार्टकटच्या नादात पाणी साचलेल्या सामसूम किंवा अज्ञात रस्त्यावर जाणं टाळा. योग्य मार्गानेच प्रवास करा. अनेकदा आपल्याला अज्ञात मार्गावरील भरलेल्या पाण्याचा अंदाज येत नाही आणि यामुळे अपघाताचा बळी ठरण्याची शक्यता असते.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI