Audi Q7 launch: ऑडी या जर्मन लग्झरी कार उत्पादक कंपनीने त्यांची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित नेक्स्ट-जनरेशन ऑडी क्यू7 (Audi Q7) च्या बुकिंग्जच्या शुभारंभाची घोषणा केली आहे. या नव्या ऑडी क्यू7 मध्ये आधुनिक तंत्रज्ञानासह स्टाइल आणि आरामाच्या बाबतीतही सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. या कारमध्ये नवीन शक्तिशाली 3.0 लीटर व्ही6 टीएफएसआय पेट्रोल इंजिन असून त्यातू 340 एचपी शक्ती, 500 एनएम टॉर्कमध्ये अवघ्या 5.9 सेकंदां प्रतितास 0 ते 100 किमीची गती प्राप्त करते. ऑडी क्यू7 5 लाख रुपये रकमेमध्ये बुक करता येऊ शकते.

  


ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्लों यांनी ही माहिती दिली असून ते म्हणाले, "2021 मध्ये नऊ उत्पादने लॉंच केल्यानंतर आम्ही आणखी एक नवीन कार घेऊन येत आहोत. आम्ही ऑडी क्यू7 या नव्या कारच्या बुकिंगचा शुभारंभ करत आहोत. ऑडी क्यू7 ची रस्त्यावरील दिमाखदार उपस्थिती आणि ऑन-रोड आणि ऑफ-रोड वैविध्यपूर्ण कार्य क्षमता यामुळे ग्राहकांमध्ये नक्कीच लोकप्रि‍य ठरणार आहे."


ऑडी क्यू7 ची खास वैशिष्ट्ये -



  • अॅडप्टिव्‍ह एअर सस्पेंशन आणि क्वॉट्रो ऑल-व्हिल ड्राइव्ह

  • पार्क असिस्ट प्लससह 360-डिग्री-व्ह्यू कॅमेरा आणि लेन डिपार्चर वॉर्निंग

  • मॅट्रिक्स एलईडी हेडलॅम्प्स आणि रिअर एलईडी टेल लॅम्प्स

  • पुढील आणि मागील बाजूस डायनॅमिक टर्न इंडिकेटर्स


कशी कराल बुक?


नवीन ऑडी क्यू7 प्रि‍मिअम प्लस आणि टेक्नोलॉजी या दोन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असेल. ग्राहक त्यांच्या घरांत बसून ही कार बुक करु शकतात. www.audi.in या संकेतस्थळावर ऑडी क्यू7 बुक करता येऊ शकते. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha




Car loan Information:

Calculate Car Loan EMI