Motorola Moto G51 5G : स्मार्टफोन कंपनी मोटोरोला 10 डिसेंबर रोजी भारतात आपला नवीन स्मार्टफोन Moto G51 5G लाँच करण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 480 Plus SoC सह येण्याची शक्यता आहे आणि देशात 12 5G बँडसाठी सपोर्ट असण्याची अपेक्षा आहे. लोकप्रिय टिपस्टर मुकुल शर्मा यांनी अलीकडेच Twitter वर जाऊन Moto G51 5G ची भारतात लाँच होण्याची तारीख जाहीर केली होती. दरम्यान, मोटोरोलाने अद्याप लाँच होण्याच्या तारखेबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मोटोरोलाने पूर्वीच्या अहवालात मोटो G51 च्या डिसेंबरमधील लाँचची सूचना दिली होती.


Moto G51 5G ची किंमत 20,000.रु असण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटीसह सर्वात स्वस्त मोटो जी-सीरीज फोन असल्याचे म्हटलं जातं आहे. युरोपमधील स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच फुल-एचडी+ (1,080x2,400 पिक्सेल) मॅक्स व्हिजन डिस्प्ले आहे ज्याचा आस्पेक्ट रेशो 20:9 आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे.  डिव्हाईस Snapdragon 480 Plus SoC द्वारे सपोर्टेड आहे, सोबत 8GB पर्यंत RAM आहे. यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये f/1.8 लेन्ससह 50MP प्राथमिक सेन्सर आहे, सोबत 8MP अल्ट्रा-वाईड शूटर आणि 2MP मॅक्रो शूटर आहे.


या स्मार्टफोनचा 13MP सेल्फी कॅमेरा सेन्सर f/2.2 लेन्ससह येतो. डिव्हाइसचा ऑनबोर्ड स्टोरेजचा 128GB पर्यंत बॅकअप आहे. जो मायक्रोएसडी कार्डद्वारे 512GB पर्यंत सपोर्ट देतो. यात 10W चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी देखील आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha