New Audi Q3 launched in india : जर्मनीतील आघाडीची लक्झरी ऑटोमोबाईल कंपनी ऑडीने (Audi) भारतात नुकतीच आपली एक नवी-कोरी कार ऑडी क्यू3 (Audi Q3) लॉन्च केली आहे. ऑडी क्यू3 कारमध्ये अगदी दर्जेदार असे फिचर्स असून फॅमिलीसाठी अगदी परफेक्ट कार आहे. ही 2nd जनरेशनमधील ऑडी क्यू3 व्हिज्युअली अधिक डायनॅमिक असण्यासोबत अधिक जागा आणि आधुनिक टेक्नोलॉजीने परिपूर्ण आहे.
या कारमध्ये 2.0 लीटर टीएफएसआय इंजिन आहे, जे 190 एचपी शक्ती आणि 320 एनएम टॉर्कची निर्मिती करते. ज्यामुळे ही कार केवळ 7.30 सेकंदांमध्ये 0 ते 100 किमी प्रतितास गती प्राप्त करते. या ऑडी क्यू3 च्या डिलिव्हरींना वर्षाच्या अखेरपर्यंत सुरूवात होईल, असंही कंपनीने सांगितलं आहे.
कलर्स आणि किंमतीचं काय?
नवीन ऑडी क्यू3 पल्स ऑरेंज, ग्लेशियर व्हाइट, क्रोनोस ग्रे, मिथोस ब्लॅक आणि नवारा ब्ल्यू या पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. कारच्या आतमध्ये अर्थात इंटीरिअर कलर्स पर्यायामध्ये ओकापी ब्राऊन आणि पर्ल बिज यांचा समावेश आहे. ऑडी क्यू3 प्रिमिअम प्लस आणि टेक्नोलॉजी या दोन व्हेरिएण्ट्समध्ये कार उपलब्ध आहे. प्रिमिअम प्लस व्हेरिएण्टची किंमत 44 लाख 89 हजार रूपये आणि टेक्नोलॉजी व्हेरिएण्टची किंमत 50 लाख 39 हजार रूपये आहे.
नवीन Audi Q3 प्रिमिअम प्लसची वैशिष्ट्ये:
- 45.72 सेमी (आर१८) 5-आर्म स्टाईल अलॉई व्हील्स
- क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह
- एलईडी हेडलॅम्प्ससह एलईडी रिअर कॉम्बीनेशन लॅम्प्स
- पॅनोरॅमिक ग्लास सनरूफ
- उच्च ग्लॉस स्टायलिंग पॅकेज
- पॉवर अॅडजस्टेबल फ्रण्ट सीट्ससह फोर-वे लम्बर सपोर्ट
- लेदर/लेदरेट कॉम्बीनेशनमध्ये सीट अपहोल्स्टरी
- रिअर सीट प्लससह फोअर/अॅफ्ट अॅडजस्टमेंट
- लेदरमध्ये रॅप केलेले ३-स्पोक मल्टीफंक्शन प्लस स्टिअरिंग व्हीलसह पॅडल शिफ्टर्स
- सिल्व्हर अॅल्युमिनिअम डायमेन्शनमध्ये डेकोरेटिव्ह इन्सर्ट्स
- अॅम्बियण्ट लायटिंग पॅकेज (सिंगल कलर)
- पुढील बाजूस स्कफ प्लेट्ससह अॅल्युमिनिअम इन्सर्ट्स
- स्टोरेज व लगेज कम्पार्टमेंट पॅकेज
- कम्फर्ट सस्पेंशन
- हिल स्टार्ट असिस्ट
- फ्रेमलेस ऑटो-डिमिंग इंटीरिअर रिअर व्ह्यू मिरर
- 2-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टिम
- पार्किंग एड प्लससह रिअर व्ह्यू कॅमेरा
- क्रूझ कंट्रोल सिस्टिमसह स्पीड लिमिटर
- एक्स्टीरिअर मिरर्स, पॉवर अॅडजस्टेबल, हिटेड आणि पॉवर फोल्डिंग, दोन्ही बाजूस ऑटो-डिमिंग
- डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर
- ब्ल्यूटूथ इंटरफेस
- ऑडी स्मार्टफोन इंटरफेस
- इलेक्ट्रोमेकॅनिकल पॉवर स्टिअरिंग
- सहा एअरबॅग्ज
- टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम
- इसोफिक्स चाइल्ड सीट अँकर्स आणि बाहेरील रिअर सीट्ससाठी टॉप टेथर
- ऑडी-थेफ्ट व्हील बोल्ट्स
- स्पेस-सेव्हिंग स्पेअर व्हील
हे देखील वाचा-
- Audi कार महागणार! ऑडी इंडियाकडून कारच्या किंमतीत वाढ
- Maruti Alto K10 First Look Review: येत आहे नवीन Maruti Alto K10, Celerio पेक्षा कमी असेल किंमत?
Car loan Information:
Calculate Car Loan EMI