Audi Cars Price Hike : अनेकांची स्वप्नवत कार असणारी ऑडी (Audi) आता महागणार आहे. एक अव्वल दर्जाची कार असल्याने ऑडीची किंमत महाग असून आता या किंमतीत आणखी वाढ होणार आहे. लक्झरी कार बनवणारी जर्मनीची प्रसिद्ध कंपनी ऑडीने भारतातील कार्सच्या विविध मॉडेल्सवरील किंमतीत 2.4% वाढ करणार असल्याची घोषणा केली आहे. कार्सच्या किंमतीतीतील गाडी उत्पादन प्रक्रियेच्या खर्चात वाढ झाल्याने करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. ही वाढ 20 सप्टेंबर 2022 पासून लागू होणार असल्याचंही कंपनीने सांगितलं आहे.


ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लों यांनी सांगितलं की, "ऑडी इंडियामध्ये आम्ही एक चांगल्याप्रकार व्यवसाय वाढवून ग्राहकांना चांगल्या सोयी पुरवू इच्छितो, पण गाडी उत्पादन प्रक्रियेच्या खर्चात वाढ झाल्याने आम्हाला आमच्या गाड्यांच्या विविध मॉडेल्सच्या किंमतीत 2.4% वाढ करण्याची गरज निर्माण झाली आहे.”


खालील कार्सच्या किंमतीत वाढ


ऑडी इंडियाच्या सध्याच्या लाईन-अपमध्ये पेट्रोलवर चालणाऱ्या ऑडी ए4, ऑडी ए6, ऑडी ए8 एल, ऑडी क्यू5, ऑडी क्यू7, ऑडी क्यू8, ऑडी एस5 स्पोर्टबॅक, ऑडी आरएस 5 स्पोर्टबॅक तसेच ऑडी आरएस क्यू8 चा समावेश आहे. ई-ट्रॉन ब्रॅण्ड अंतर्गत कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहन पोर्टफोलियोमध्ये ऑडी ई-ट्रॉन 50, ऑडी ई-ट्रॉन 55, ऑडी ई-ट्रॉन स्पोर्टबॅक 55, पहिल्या इलेक्ट्रिक सुपरकार्स ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी इत्यादींचा समावेश आहे. ऑडीने नुकतेच भारतातील सर्वाधिक पसंतीस मिळालेले मॉडेल ऑडी क्यू3 करिता ऑनलाईन बुकिंग सुरु केली आहे.


लवकरत लॉंच होणार Audi Q3


काही दिवसांपूर्वीच ऑडीने आपली कार Audi A8 L लॉन्च केली. आता या लक्झरी SUV च्या चाहत्यांसाठी ऑडी निर्माता कंपनी आपली दुसरी कार New Audi Q3 लवकरच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Audi Q3 ही नवीन व्हर्जनमध्ये लॉन्च होणार आहे. पुढील महिन्यात ही कार बाजारात येणार आहे. या कारची आणखी काय वैशिष्ट्ये आहेत हे जाणून घ्या. नवीन Audi Q3 ला अधिक हटके डिझाईन आणि क्रोम सराउंड असलेल्या नवीन A8 प्रमाणेच एक मोठी ग्रिल मिळते आणि ती लांब, रुंद तसेच ब्लॅक आउट बिट्ससह आहे जी स्पोर्टियर लूकसाठी दिसू शकते. कारमध्ये मोठ्या टचस्क्रीनसह लांब व्हीलबेस आणि रुमियर इंटीरियरसह आतील बाजूस अधिक स्पेस असण्याची शक्यता आहे. एक लक्झरी SUV असल्याने पॅनोरामिक सनरूफ, 360 डिग्री कॅमेरा आणि बरेच काही यासह सर्व वैशिष्ट्यांची अपेक्षा आहे. 


हे देखील वाचा-



Car loan Information:

Calculate Car Loan EMI