Upcoming Cars: ऑडी A8L फेसलिफ्ट लाँच केल्यानंतर ऑडी इंडिया आता दुसऱ्या-जनरल ऑडी Q3 सादर करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही SUV पुढील महिन्यात लॉन्च केली जाऊ शकते. ज्याची डिलिव्हरी आगामी सणासुदीच्या काळात सुरू होऊ शकते. तत्पूर्वी नवीन Audi Q3 2019 मध्ये जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आली होती.

Continues below advertisement

BS6 उत्सर्जन मानदंडांच्या अंमलबजावणीनंतर ऑडी इंडियाच्या योजनांच्या संपूर्ण फेरबदलामुळे याला भारतीय बाजारात येण्यास खूप विलंब झाला आहे. नवीन-जनरल ऑडी Q3 मध्ये फ्रंट-एंड डिझाइन मिळेल. जे स्पष्टपणे कंपनीच्या प्रमुख ऑडी Q8 SUV शी प्रेरित असेल. याशिवाय कारला फ्रंट बंपरच्या तळाशी एक मोठी ग्रिल आणि हेक्सागोनल फॉग लॅम्प्स मिळतील. साइड प्रोफाईलमध्ये ऑडी Q3 चा SUV सारखा लुक ब्लॅक-आउट साइड स्कर्टने सुशोभित असेल.

याशिवाय नवीन ऑडी Q3 चा मागील भागात अपडेटेड एलईडी टेल-लाइट्स आणि रिप्रोफाइल्ड बंपर मिळेल. इंटिरिअर्सबद्दल बोलायचे झाले तर, ऑडी Q3 च्या इंटीरियरमध्ये पूर्णपणे नवीन केबिन असेल. यात बर्‍याच तंत्रज्ञान-केंद्रित फीचर्स देण्यात येणार आहे. यात स्टँडर्ड 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्लेसह 10.1-इंचाच्या इन्फोटेनमेंट टचस्क्रीन मिळू शकते. इतर अपेक्षित फीचर्समध्ये 360-डिग्री कॅमेरा, क्रूझ कंट्रोल आणि पार्क असिस्टचा समावेश आहे.

Continues below advertisement

जागतिक बाजारात लॉन्च करण्यात आलेल्या ऑडी Q3 मध्ये 1.5-लीटर टर्बो-पेट्रोल आणि 2.0-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. भारत लॉन्च होणाऱ्या आगामी ऑडी Q3 बद्दल बोलायचे झाल्यास, यात 2.0-लिटर चार-सिलेंडर टर्बो-पेट्रोल इंजिन मिळू शकते. जे 190 bhp ची पॉवर जनरेट करते. या इंजिनला 7-स्पीड डीसीटी गिअरबॉक्ससह ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टम मिळते. भारतात लॉन्च झाल्यानंतर ऑडी Q3 मर्सिडीज-बेंझ GLA, Volvo XC40 आणि BMW X1 शी स्पर्धा करेल.

महत्वाच्या बातम्या : 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI