Mahindra Car Discount : भारतीय वाहन निर्माता कंपनी महिंद्रा (Mahindra) आपल्या SUV कारवर मोठ्या सवलतीच्या ऑफर देत आहे. या डिस्काउंट अंतर्गत कंपनी कॅश डिस्काउंट आणि फ्री अॅक्सेसरीज देत आहे. कंपनीच्या या डिस्काउंट अंतर्गत बोलेरो, XUV 300, Mahindra Marazzo आणि Scorpio KUV100 NXT सारख्या SUV कारचा समावेश आहे. या सवलतीच्या ऑफर अत्यंत मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहेत आणि 31 ऑगस्ट रोजी संपतील. यापैकी कोणतीही महिंद्रा कार घ्यायची असेल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या SUV वर किती डिस्काउंट मिळत आहे.


Mahindra Bolero


या सर्वात लोकप्रिय महिंद्रा कारला 1.5L डिझेल इंजिन मिळते जे 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. महिंद्रा या कारवर ₹ 10,000 ची रोख सवलत आणि ₹ 10,000 च्या मोफत अॅक्सेसरीज देत आहे. अशा प्रकारे नवीन बोलेरोच्या खरेदीवर ₹20,000 ची बचत केली जाऊ शकते.


महिंद्रा XUV300


ही सब-4 मीटर एसयूव्ही आहे, ज्यावर महिंद्र 30,000 रुपयांची रोख सूट आणि 10,000 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीज देत आहे. अशाप्रकारे, या वाहनाच्या खरेदीवर एकूण ₹ 40,000 पर्यंतची बचत केली जाऊ शकते. ही कार भारतीय बाजारपेठेत टाटा नेक्सन, मारुती सुझुकी ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू आणि किया सोनेट यांच्याशी स्पर्धा करते.


महिंद्रा KUV100 NXT


महिंद्राची ही सर्वात छोटी एसयूव्ही आहे. कंपनी या कारवर ₹ 15,000 च्या रोख सवलतीसह ₹ 10,000 किमतीच्या मोफत अॅक्सेसरीज देखील देत आहे. एकूणच, या कारच्या खरेदीवर ग्राहकांना ₹ 25,000 ची सूट मिळत आहे.


महिंद्रा Marazzo


महिंद्राने या एमपीव्हीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. या कारमध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन उपलब्ध आहे. जे 121 bhp पॉवर जनरेट करते. महिंद्रा या वाहनाच्या निवडक प्रकारांवर 25,000 रुपयांची रोख सूट देत आहे. मात्र, त्यावर कोणतेही मोफत सामान दिले जात नाही.


तीन-चाकी इलेक्ट्रिक कार्गो झोर ग्रँड लॉन्च


दरम्यान, महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडने भारतात आपली नवीन तीन-चाकी इलेक्ट्रिक कार्गो झोर ग्रँड लॉन्च केली आहे. नवीन Zor Grand भारतात 3.60 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम, बंगलोर) किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीला झोर ग्रँडसाठी 12,000 पेक्षा जास्त युनिट्सचे बुकिंग आधीच मिळाले आहे. Mahindra Logistics, Magenta EV Solutions, YOLO EV आणि Jingo EV सारख्या कंपन्यांकडून Mahindra Zor Grand e-Cargo साठी बुकिंग प्राप्त झाले आहे.


महत्वाच्या बातम्या : 



 


 


 


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI