Maruti Alto K10 First Look Review: अल्टो म्हटलं की सामन्याची परवडणारी कार असं चित्र डोळ्यासमोर उभं राहत. या कारने अनेकांचं वाहन घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. भारतात ही कार लॉन्च झाल्यापासून ते आतापर्यंत याची लोकप्रियता आहे, तशीच आहे. आता कंपनी याच कारचा अपडेटेड व्हर्जन K10 भारतीय बाजारात घेऊन येत आहे. यात पॉवरफुल 800cc चे इंजिन देण्यात आले आहे. कंपनीच्या या नेक्स्ट जनरेशन कारची किंमत Celerio कारपेक्षा कमी किंवा त्या इतकीच असू शकते. कंपनीने आपल्या नवीन कारमध्ये अनेक बदल केले आहेत. तसेच कंपनीने यात नवीन फीचर्सही दिले आहेत.
ऑटोचा हा नेक्स्ट जनरेशन मॉडेल जुन्या कारच्या तुलनेत अधिक मोठा दिसतो. ही कार काही प्रमाणात गोलाकार असून याची डिजाइन बऱ्यापैकी कंपनीच्या सेलेरियो कार सारखीच असल्याचे दिसते. याच्या समोरील बाजूस एक मोठी लोखंडी ग्रील मिळते. तसेच यात मोठे हेडलॅम्प दिले आहेत. ही कार हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. ज्यावर मारुतीच्या इतर कारही याआधी तयार करण्यात आल्या आहेत. कार सेफ्टीसाठी याचा मोठा फायदा होईल.
नवीन अल्टोचे इंटीरियर देखील कंपनीने बदल आहेत. जुन्या कारच्या तुलनेत नवीन कारमध्ये देण्यात आलेले इंटीरियर अधिक आधुनिक दिसते. असं असलं तरी यात ही Celerio प्रमाणेच काही समान फीचर्स या कारमध्ये पाहायला मिळणार. ज्यात एअर व्हेंट्स आणि टचस्क्रीन समान डिझाइनसह दिसून येते. याच्या मध्यभागी विंडो स्विचेस देखील मिळतात. यातील ड्रायव्हर डिस्प्ले देखील Celerio कारमधील असल्या सारखाच दिसतो. असं असलं तरी यात Celerio प्रमाणे स्टीयरिंग कंट्रोल किंवा मागील पार्किंग सेन्सर्स कॅमेरा ग्राहकांना मिळणार नाही. इंजिन मॅन्युअल आणि AMT पर्यायांसह नवीन Dualjet 1.0l असेल तर पॉवर आउटपुट 69 bhp असेल. यात CNG पर्यायाची मिळू शकतो. दरम्यान, ही कार कधी लॉन्च होणार किंवा याची किंमत किती असेल, याबाबत कंपनीने अद्याप अधीकृत माहिती जाहीर केलेली नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Royal Enfield : दमदार फिचर्स घेऊन लवकरच बाजारात येणार Hunter 350; पाहा फर्स्ट लूक
- Car : Kia Sonet कंपनीकडून चाहत्यांना धक्का; सलग दुसऱ्यांदा वाढली कारची किंमत
- TVS घेऊन येत आहे हायड्रोजनवर धावणारी स्कूटर, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Car loan Information:
Calculate Car Loan EMI