Tata Motors : कारप्रेमींना कोणतीही कार विकत घ्यायची असेल तर अर्थातच ते सर्वात आधी ब्रॅंडकडे वळतात. यामध्ये अनेकांची टाटा मोटर्स (Tata Motors) कारला पसंती असते. अर्थात, टाटा मोटर्सच्या सर्वच कार या अतिशय महागड्या पण जास्त टिकाऊ आणि अपडेटेड असतात. पण, तुम्हाला माहीत आहे का? टाटा मोटर्स ही भारतातील ऑटोमोबाईल उद्योगातील सर्वात मौल्यवान कंपनी असू शकते. पण, कार विक्रीच्या बाबतीत, मारुती सुझुकी ही देशातील सर्वात विश्वासार्ह कंपनी आहे. यामध्ये टाटा मोटर्सचा वाटा केवळ एक तृतीयांश इतका आहे.


भारतीय बाजारपेठेत गेल्या जानेवारी महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार कंपन्यांची यादी समोर आली असून नेहमीप्रमाणे मारुती सुझुकी (Maruti Suzuki) पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर ह्युंदाई (Hyundai) मोटर इंडिया लिमिटेडने आपली पोझिशन सुधारली असून टाटा मोटर्सला मागे टाकून दुसरे स्थान मिळवले आहे. टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.


भारतात अनेक भारतीय आणि परदेशी कार कंपन्या आहेत. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, 90 टक्के ग्राहक फक्त 6 कंपन्यांकडून कार खरेदी करतात. या कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी (Maruti Suzuki), ह्युंदाई मोटर (Hyundai Motor), टाटा मोटर्स (Tata Motors), महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra), किया मोटर्स (Kia Motors) आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर या कंपन्यांचा समावेश आहे. यानंतर Honda, Renault, MG Motor, Volkswagen, Nissan, Skoda, Citroen आणि Jeep यासह इतर लक्झरी कार कंपन्यांचा क्रमांक लागतो.


मारुती आणि ह्युंदाई 'या' लोकांच्या आवडत्या कंपनी 


या कंपन्यांचा गेल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी 2024 च्या विक्री अहवालावर नजर टाकली तर, पहिल्या स्थानावर असलेल्या मारुती सुझुकीने सुमारे 1.67 लाख कार विकल्या, जी 13 टक्क्यांहून अधिक वार्षिक वाढ आहे आणि या कारचा बाजारातील हिस्सा 1.67 लाखांपेक्षा जास्त आहे. 42 टक्के यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या Hyundai Motor India ने गेल्या जानेवारीमध्ये 57 हजारांहून अधिक प्रवासी वाहने विकली आणि सुमारे 14 टक्क्यांच्या वार्षिक वाढीसह त्यांनी 14 टक्क्यांहून अधिक बाजारपेठेवर कब्जा केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


महिंद्रा XUV300 आणि XUV400 वर या महिन्यात मिळतेय भरघोस सूट; 4.2 लाख रुपयांपर्यंतची होईल मोठी बचत


Car loan Information:

Calculate Car Loan EMI