Discount on Mahindra Cars : दिग्गज कार निर्माता कंपनी महिंद्रा (Mahindra) आपली कार XUV300 फेसलिफ्ट लॉन्च होण्यापूर्वी डीलर्स 2023 आणि 2024 च्या मॉडेल्सवर XUV300 वर मोठ्या सवलती आणि फायदे देऊन जुन्या मॉडेलचा स्टॉक कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे फायदे कॅस डिस्काऊंट, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट सवलत, सहाय्यक उपकरणे आणि एक्सटेंडेड वॉरंटी या स्वरूपात उपलब्ध आहेत. 2023 मॉडेल वर्षातील कमी विक्री होणाऱ्या XUV400 EV चा डीलर्सकडे मोठा साठा आहे, त्यामुळेच या मॉडेलवर प्रचंड सवलती सुरू आहेत आणि गेल्या महिन्याच्या तुलनेत त्यात वाढही करण्यात आली आहे.  तरी, प्रत्येक कारवर कितीपर्यंत सूट मिळते ते जाणून घेऊयात.               


Mahindra XUV300 वर सूट


Kia Sonet आणि Tata Nexon शी स्पर्धा करणारी (Mahindra & Mahindra) Mahindra XUV300, या महिन्यात 1.82 लाखांपर्यंत सूट आणि फायद्यांसह विकली जात आहे. ही सूट वेगवेगळ्या मॉडेल वर्ष, प्रकार आणि पॉवरट्रेनवर अवलंबून असते. सर्वाधिक सवलत टॉप-स्पेक W8 च्या 2023 XUV300 डिझेल इंजिन प्रकारावर आहे. त्याच वेरिएंटच्या 2024 मॉडेलवर 1.57 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. रेंज-टॉपिंग MY23


निवडलेल्या पॉवरट्रेनवर अवलंबून, W6 ट्रिम्समध्ये 94,000 रूपयांपासून ते 1.33 लाखांपर्यंत सूट आहे, तर W4 आणि W2 व्हेरिएंटना अनुक्रमे 51,935-73,000 आणि 45,000 चे फायदे मिळतात. XUV300 सध्या 110hp, 1.2-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन, 117hp, 1.5-लिटर डिझेल आणि 131hp, 1.2-लिटर डायरेक्ट-इंजेक्शन टर्बो-पेट्रोल युनिटसह उपलब्ध आहे. ज्यामध्ये मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे. XUV300 फेसलिफ्टमध्ये TGDi इंजिनसाठी टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक पर्याय मिळण्याची अपेक्षा आहे.


Mahindra XUV400 वर सूट


या महिन्यात देखील, XUV400 वर मोठ्या सवलती अंतर्गत, मागील वर्षीच्या मॉडेलवर 4.2 लाखांपेक्षा जास्त किमतीचे फायदे दिले जात आहेत. गेल्या वर्षीच्या ग्राहकांना लाभ मिळत आहे. ESC सह XUV400 EL ट्रिम या महिन्यात 3.4 लाख रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहे. तथापि, 2024 मॉडेलवर केवळ 40,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज आणि कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.


गेल्या महिन्यात, महिंद्राने XUV400 EV चे सर्वात महत्त्वाचे अपडेट दिले, जे तीन ट्रिममध्ये उपलब्ध आहे. 2024 XUV400 ची एक्स-शोरूम किंमत 15.49 लाख ते 17.49 लाख रुपये आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


Samsung Galaxy XCover 7 : यूएस मिलिट्री सर्टिफाईड पहिला स्मार्टफोन भारतात लॉन्च; सॅमसंगच्या या फोनची 'ही' आहे खासियत


Car loan Information:

Calculate Car Loan EMI