Matter Aera Electric Bike: मॅटर एनर्जीने आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक केली लॉन्च, मिळणार जबरदस्त रेंज
Matter Aera Electric Bike : इलेक्ट्रिक वाहन उत्पादक मॅटर एनर्जीने भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक Era लॉन्च केली आहे.
Matter Aera Electric Bike : इलेक्ट्रिक वाहन उत्पादक Matter एनर्जीने भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक Era लॉन्च केली आहे. कंपनीने या बाईकच्या 5000 व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 1.44 लाख रुपये आणि टॉप-स्पेक 5000+ व्हेरिएंटची किंमत 1.54 लाख रुपये ठेवली आहे. पुढे जाऊन या बाईकचे चार प्रकार बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतील. या बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
Matter Aera Electric Bike : कशी आहे Era इलेक्ट्रिक बाईक?
Matter Era ची किंमत 5000 आणि 5000+ व्हेरियंटसाठी अनुक्रमे 1.44 लाख आणि 1.54 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. बॅटरी पॅक आणि बाईक या दोन्हींवर 3 वर्षांची मानक वॉरंटी असेल. मात्र यासाठी तुम्हाला वेगळा चार्जर घ्यावा लागेल, ज्याची किंमत सध्या उघड करण्यात आलेली नाही.
Matter Aera Electric Bike : पुढील महिन्यापर्यंत 20 डीलरशिप सुरू होतील
मॅटर एनर्जीने म्हटले आहे की, त्याचे पहिले experience centre अहमदाबादमध्ये पुढील 45 दिवसांत उघडणार आहे आणि कंपनी पुढील तीन महिन्यांत देशभरात 20 डीलरशिप उघडण्याची योजना आखत आहे. तसेच या वर्षाच्या अखेरीस त्यांची संख्या 100 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
Matter Aera Electric Bike : लवकरच सुरू होईल बुकिंग
सध्या मुंबई, दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद, कोलकाता, पुणे आणि चेन्नई या मेट्रो आणि टियर-1 शहरांमध्ये बाईकच्या प्री-ऑर्डर खुल्या आहेत. Matter एरा साठी बुकिंग पुढील 30 दिवसात उघडण्याची अपेक्षा आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांची उत्पादन सुविधा तयार करण्यास सुरुवात केली आहे. मात्र डिलिव्हरीची अंतिम मुदत काय असेल याबाबत कंपनीने काहीही सांगितलेले नाही.
Hop Oxo Electric Bike लॉन्च
हॉप इलेक्ट्रिकने आपली हॉप ऑक्सो इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.60 लाख ते 1.80 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. हैदराबादमधील हिमायत नगर, उप्पल, करमनघाट, मलाकपेट, कोमपल्ली, कुकटपल्ली आणि मेडचल या 10 केंद्रावर ही बाईक विक्रीसाठी उपलब्ध आहे. Hop Oxo इलेक्ट्रिक बाईकमध्ये 3.75 kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी वापरण्यात आली आहे. जी BLDC हब मोटरला जोडलेली आहे. ही मोटर 5.2 kW/6.2 kW ची कमाल पॉवर आणि 185 Nm/200 Nm कमाल टॉर्क जनरेट करू शकते. या बाईकचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे. अंदाजे 135 किमी ते 150 किमीचा दावा केला आहे. 850W चा चार्जर वापरून ही बाईक 4 तासात 0 ते 80 टक्के चार्ज करता येते. यात इको, पॉवर, स्पोर्ट आणि रिव्हर्स 4 राइडिंग मोडसह FOC वेक्टर कंट्रोल देखील आहे.