Maruti Suzuki Recalls 9125 Vehicles : देशातील आघाडीची कार कंपनी मारुती सुझुकी इंडिया (MSI) ने त्यांच्या कारमधील दोषांमुळे अनेक मॉडेल्स परत मागवले आहेत. कंपनीच्या सियाझ, ब्रेझा, एर्टिगा, XL6 आणि ग्रँड विटारा कारचे 9,125 युनिट्स बाजारातून परत मागवण्यात आले आहेत. मारुती कंपनीने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, या वाहनांचे उत्पादन 2 ते 28 नोव्हेंबर 2022 या कालावधीत झाले असून याच्या फ्रंट सीट बेल्टमध्ये काही संभाव्य दोष आढळून आले आहेत. 


 9,125 युनिट्स परत मागवले


मारुती सुझुकीने म्हटले की, ज्या वाहनांमध्ये दोष आढळून आला आहे त्या गाड्या परत मागवत आहोत. या कारच्या सीटबेल्टमध्ये दोष आढळला असून कंपनी हा बेल्ट मोफत बदलणार आहे. मारुतीच्या अधिकृत डीलरशीपद्वारे लवकरच ग्राहकांशी संपर्क साधला जाईल. 2 ते 28 नोव्हेंबर 2022 दरम्यान उत्पादित केलेले वरीलपैकी कोणतेही मॉडेल खरेदी केले असल्यास, ते परत करा. कारण सीट बेल्टच्या बिघाडामुळे तुमच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कारच्या फ्रंट सीट बेल्टच्या असेंब्लीच्या चाइल्ड पार्ट्समध्ये समस्या असल्याचे आढळत आहे. त्यामुळे केवळ धक्का लागल्याने सीट बेल्ट तुटण्याचा धोका आहे, जो प्रवाशांसाठी जीवघेणा ठरू शकतो. हे निराकरण करण्यासाठी या गाड्या परत मागवण्यात आल्या आहेत.


सीट बेल्ट मोफत बदलला जाईल
कंपनीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, "आमच्या ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि काळजी घेऊन, कंपनीने ही वाहने चाचणीसाठी परत बोलावण्याचा आणि दोष असलेला भाग विनामूल्य बदलण्याचा निर्णय घेतला आहे." कंपनीने म्हटले, या कारच्या सीटबेल्ट संबंधित आतापर्यंत असे एकही प्रकरण त्यांच्याकडे आले नव्हते आहे.


ऑक्टोबरमध्येही वाहने परत मागवली
काही दोषांमुळे मारुतीने वाहने परत मागवण्याचा या वर्षातील हा पहिलाच प्रसंग नाही. या वर्षाच्या सुरुवातीला ऑक्टोबरमध्ये कंपनीने अनेक कार रिकॉल केल्या होत्या. त्यावेळी, कारच्या फ्रंट ब्रेक दोषामुळे 9,925 कार परत बोलावण्यात आल्या होत्या, ज्यात WagonR, Celerio आणि Ignis सारख्या मॉडेलचा समावेश होता.


एप्रिलमध्ये 19,731 Eeco झाली रिकॉल
मारुती कंपनीकडून या वर्षी एप्रिलमध्येही हजारो गाड्या परत मागवण्यात आल्या होत्या. एप्रिलमध्ये, कंपनीने Eeco MPV च्या 19,731 युनिट्स परत मागवल्या होत्या. त्याच्या चाकाच्या आकारात विसंगती आढळून आली होती.


इतर महत्वाच्या बातम्या


मारुती सुझुकीची गाडी डिसेंबर आधीच घ्या, जानेवारीपासून मारुतीच्या सर्व मॉडेल्सच्या किंमत वाढणार


Car loan Information:

Calculate Car Loan EMI