Ola Electric Scooter December Offers: ओला इलेक्ट्रिकने त्यांच्या 'डिसेंबर टू रिमेंबर' (December to Remember) योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्यासाठी खास ऑफर आणल्या आहेत. या अंतर्गत इलेक्ट्रिक स्कूटरच्या खरेदीवर 10,000 ची सूट दिली जात आहे. सूटनंतर Ola S1 Pro ची किंमत 1.30 लाख रुपये (एक्स-शोरूम) झाली आहे. कंपनीने झिरो डाऊन पेमेंट आणि ईएमआय 2,499 रुपयांपासून सुरू केले आहे. तर याचे व्याजदर 8.99% पासून सुरू होतात.


या ऑफरबद्दल बोलताना ओला इलेक्ट्रिकचे मुख्य मार्केटिंग अधिकारी अंशुल खंडेलवाल म्हणाले, “भारतात इलेक्ट्रिक वाहन खूप पसंत केले जात आहेत. लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर मार्केटमध्ये पुढे राहणास आम्हाला मदत झाली आहे. आता आम्ही दर महिन्याला बक्षिसांसह कार्यक्रम घेऊन येत आहोत.'' 


सवलती व्यतिरिक्त, स्कूटर खरेदीदारांना स्कूटरला वित्तपुरवठा करण्यावर झिरो प्रक्रिया शुल्काचा लाभ देखील मिळणार आहे. तर निवडक क्रेडिट कार्डांवर अतिरिक्त सवलत उपलब्ध आहे. कंपनीने असेही म्हटले आहे की, ते त्यांच्या हायपरचार्जर नेटवर्कवर एक वर्ष विनामूल्य चार्जिंगची ऑफर देत आहे. याशिवाय विद्यमान Ola ग्राहक रिवॉर्ड्स रेफरल प्रोग्राम अंतर्गत लाभ घेऊ शकतात. तर कंपनी तिच्या अनुभव केंद्रांवर आयोजित करण्यात येणाऱ्या रॅफल स्पर्धेच्या विजेत्यांना 10 मोफत S1 प्रो स्कूटर देण्याची योजना आखत आहे. मात्र नुकत्याच लॉन्च  झालेल्या S1 Air वर विशेष सवलत देण्यात आलेली नाही.


विक्रीचा विचार करता ओला इलेक्ट्रिक 1 लाख आणि त्याहून अधिक किमतीच्या स्कूटर सेगमेंटमध्ये प्रीमियम EV स्पेसमध्ये आघाडीवर आहे. कंपनीने या वर्षी नोव्हेंबरमध्ये 20,000 हून अधिक वाहनांची विक्री केली आहे.  या सेगमेंटमध्ये 50% Revenue मिळवण्यात कंपनी सक्षम झाली आहे. कंपनीच्या S1 Pro स्कूटरची एक्स-शोरूम (ola s1 pro price) किंमत 1.40 लाख रुपये (डिस्काउंटशिवाय) आहे. FAME सबसिडीनंतर सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत. कंपनी आपल्या अनुभव केंद्रांचा विस्तार (ola experience center) करत आहे. ज्यामध्ये 50 आधीच आहेत आणि या महिन्याच्या अखेरीस देशभरात सुमारे 100 उघडली जातील. मार्च 2023 पर्यंत 200 अनुभव केंद्रे उघडण्याचे ओला इलेक्ट्रिकचे उद्दिष्ट आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Royal Enfield Bike : येत आहे नवीन Royal Enfield 450cc Roadster, BMW 310GS ला देणार टक्कर


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI