Maruti Suzuki Off Road car: मारुती सुझुकी (Maruti Suzuki) या महिन्याच्या अखेरीस कंपनीची खास जिमनी 5 डोअर ऑफ रोड SUV (Jimny 5-door Off Road SUV) कार देशात लॉन्च करणार आहे. कंपनीने जानेवारीपासूनच या कारसाठी बुकिंग स्वीकारण्यास सुरुवात केली होती. 


देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) या वर्षी 20 लाखांहून अधिक कारचे उत्पादन (Car Production) करण्याच्या तयारीत आहे. चालू आर्थिक वर्षात विक्रमी 22 लाख प्रवासी कार (Traveller Car) आणि SUV चे उत्पादन करण्याची योजना आखत आहे. देशातील वेगाने वाढणारी SUV बाजारपेठ काबीज करण्यासाठी आणि त्यांच्या इतर प्रतिस्पर्ध्यांना जोरदार टक्कर देण्यासाठी कंपनी आपली उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दिशेने काम करत आहे. गेल्या आर्थिक वर्षातही कंपनीने आपल्या योजना पूर्ण करण्यासाठी पुरवठादार भागीदारांशी हात मिळवला आहे.


12 टक्क्यांनी वाढणार उत्पादन


नवीन मॉडेल्सबद्दल ग्राहकांमधील वाढता उत्साह आणि चांगल्या प्रतिसाद यामुळे कंपनीच्या प्री-ऑर्डरमध्ये वाढ झाली आहे. मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीने उत्पादन वाढवणे देखील आवश्यक आहे. कंपनीच्या योजनांनुसार, चालू आर्थिक वर्षात उत्पादनाचा दर सुमारे 12 टक्के वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनी उत्पादन वाढवण्यात यशस्वी ठरली तर हे कंपनीच्या विक्रमी उत्पादन वाढीचे सलग तिसरे वर्ष ठरेल. 


इतके होईल उत्पादन


इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, मारुतीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 22 लाख कारचे उत्पादन करण्याची योजना आखली आहे, जी मागील वर्षी 20 लाखांहून कमी होती, ज्यातील 2 लाख 79 हजार कारची निर्यात केली गेली. त्यामुळे कंपनीला उद्योग उत्पादन दुप्पट वाढवण्याचे लक्ष्य गाठण्यास मदत होईल.


कंपनीने काय म्हटले?


मारुतीच्या सेल्स आणि मार्केटिंगचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी (Senior Executive Officer) शशांक श्रीवास्तव यांनी या क्षणी कंपनीच्या उत्पादन लक्ष्यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे, परंतु कंपनीला चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.


लवकरच लॉन्च होणार जिमनी


मारुती सुझुकी (Maruti Suzuki) या महिन्याच्या अखेरीस आपली खास जिमनी 5 डोअर ऑफ रोड SUV (Jimny 5-door Off Road SUV) कार देशात लॉन्च करणार आहे. कंपनीने जानेवारीपासूनच या कारसाठी बुकिंग स्वीकारण्यास सुरुवात केली होती.


संबंधित बातम्या:


New Ducati Monster SP Launched: डुकाटीची नवीन बाईक लॉन्च, कावासाकी आणि ट्रायम्फ स्पोर्ट्स बाईकला देणार टक्कर!


Car loan Information:

Calculate Car Loan EMI