Electric Scooter Range: बाजारात विविध रेंजच्या अनेक इलेक्ट्रिक स्कूटर्स (Electronic Scooters) उपलब्ध आहेत, ज्या 60 किलोमीटरच्या रेंजपासून ते 200 किलोमीटरपेक्षा जास्त रेंजच्या आहेत. बरेच जण त्यांच्या स्कूटरला कमी रेंज मिळत असल्याची तक्रार करतात. अशा परिस्थितीत काही महत्त्वाच्या टिप्सचा अवलंब करून तुम्ही तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज वाढवू शकता.


स्कूटर ओव्हरलोड करू नका


तुम्ही तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरवर जास्त भार टाकू नका. स्कूटरवर एकाच प्रवाशाने प्रवास केल्यास अधिक रेंज मिळेल. एकहून अधिक लोक इलेक्ट्रिक स्कूटरवर बसणार नाही, यासाठी प्रयत्न करा. ओव्हरलोडिंगमुळे स्कूटरची रेंज कमी होते, तसेच बॅटरी आणि मोटर लवकर खराब होते.


बॅटरी वाचवा


इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज त्याच्या बॅटरीच्या चार्जिंग लेव्हलवर अवलंबून असते. जर बॅटरी कमी चार्ज होत असेल तर जास्त रेंज उपलब्ध होणार नाही. त्यामुळे बॅटरीची जास्तीत जास्त बचत करण्यासाठी, स्कूटरचे अतिरिक्त फिचर्स जसे की मोबाईल कनेक्टिव्हिटी, म्युझिक सिस्टीम, नेव्हिगेशन सारखे अॅडव्हान्स फिचर्स आवश्यक असेल तेव्हाच वापरा.


गती राखा


इलेक्ट्रिक स्कूटरचा वेग पुन्हा पुन्हा कमी करु नका किंवा एकदमच वाढवूही नका, त्यामुळे रेंजवर परिणाम होऊ शकतो. इलेक्ट्रिक स्कूटर कमी आरपीएमवर चालवल्यास वाहन जास्त अंतरापर्यंत चालवता येते.


ट्रॅफिक सिग्नलवर स्कूटर बंद करा


जर तुम्ही जॅम किंवा सिग्नलवर अडकले असाल आणि तुम्हाला बराच वेळ वाट पाहावी लागत असेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही तुमची स्कूटर बंद करावी, ज्यामुळे बॅटरी अनावश्यकपणे खर्च होणार नाही. मात्र, काही सेकंद थांबायचे असल्यास स्कूटर बंद करू नका.


पूर्णपणे डिस्चार्ज करू नका


इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीला पूर्णपणे संपू देऊ नका. इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी पूर्ण संपेपर्यंत स्कूटर चालवली तर बॅटरीचे आयुष्य (Battery Life) कमी होते. वेळेत बॅटरी चार्ज केल्यास तुम्हाला दीर्घकाळ चांगली रेंज मिळेल.


वेळेवर चार्ज करण्यास विसरू नका


ज्याप्रमाणे माणसाला वेळोवेळी अन्नाची गरज असते, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी देखील वेळोवेळी चार्ज करावी लागते, ज्यामुळे बॅटरीची स्थिती चांगली राहते आणि अधिक रेंज मिळते. जेव्हा बॅटरी 20 टक्क्यांवर जाईल, तेव्हा लगेच बॅटरी चार्ज करा. 20 टक्क्यांखाली बॅटरी येऊ देऊ नका.बॅटरी पूर्ण संपण्याची प्रतीक्षा करू नका, तसेच बॅटरी जास्त चार्ज करणे देखील टाळा.


संबंधित बातम्या:


Mahindra Thar : महिंद्रा थारचे लवकरच नवीन डिझाइन; आंतरराष्ट्रीय बाजारात लाँचिंगसाठी तयार


Car loan Information:

Calculate Car Loan EMI