Toyota Innova Crysta Price: टोयोटा किर्लोस्कर मोटरने आज तिच्या सर्वाधिक मागणी असलेल्या MPV इनोव्हा क्रिस्टा डिझेलच्या दोन मॉडेलच्या किमती जाहीर केल्या आहेत. नवीन क्रिस्टा चार प्रकारांमध्ये (G, GX, VX, ZX) उपलब्ध आहे, ज्यामध्ये कंपनीने G आणि GX मॉडेलच्या किमतींची माहिती गेल्या महिन्यातच दिली होती आणि आज कंपनीने आपल्या VX आणि ZX च्या किमतीही जाहीर केल्या आहेत.


किंमत


इनोव्हा क्रिस्टाच्या ZX मॉडेल (Innova Crysta ZX Model) ची किंमत 25.43 लाख रुपये ठेवण्यात आली आहे, ही 7 सीटर मॉडेल आहे. हेच जर 8 सीटरबद्दल बोलायचे झाले, तर 8 सीट्ससह येणारी क्रिस्टा VX मॉडेल (Innova Crysta VX Model) 23.84 लाख रुपयांना खरेदी करता येणार आहे. VXचे 7 सीटर व्हर्जन 23.79 लाख रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. ज्यासाठी कंपनीने आधीच बुकिंग सुरू केली आहे. ऑनलाइन किंवा तुमच्या जवळच्या डीलरशिपला भेट देऊन तुम्ही गाडी बुक करु शकता. इनोव्हा क्रिस्टाची बुकिंग रक्कम 50,000 रुपये इतकी आहे.


नव्या मॉडेलमध्ये काय आहेत बदल?


नवीन इनोव्हा क्रिस्टा (Innova Crysta) 2023 मध्ये काही किरकोळ बदल केले गेले आहेत. क्रोम इन्सर्टसह ट्रॅपेझॉइडल ब्लॅक ग्रिल आणि बंपरमध्ये थोडासा बदल केला गेला आहे. परंतु हेडलाइट सारख्याच ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय त्याच्या डॅशबोर्डचे लेआउट आणि डिझाइनही पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आले आहे. तर नवीन मॉडेलमध्ये नव्या प्रकारची आणि मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन देण्यात आली आहे.


फिचर्स


इनोव्हा क्रिस्टाच्या नव्या फिचर्सबद्दल बोलायचं झालं तर सुरक्षेसाठी त्याच्या पुढील आणि मागील बाजूस एकूण 7 एअरबॅग्ज (Air bags) देण्यात आल्या आहेत. याशिवाय पार्किंग सेन्सर्स, ABS आणि EBD, 8वे अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, अ‍ॅपल आणि अँड्रॉइडला सपोर्ट करणारी 8 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, व्हेईकल ट्रॅकिंग, जिओफेसिंग, अ‍ॅम्बियंट लाइटिंग यांसारखे फिचर्स क्रिस्टाच्या नव्या मॉडेलमध्ये देण्यात आले आहेत.


पॉवर ट्रेन


टोयोटा इनोव्हा क्रिस्टा फक्त डिझेल इंजिनसह येते, ज्यामध्ये 2.4L टर्बोचार्ज डिझेल इंजिन समाविष्ट आहे जे 150ps कमाल पॉवर आणि 343Nm पीक टॉर्क निर्माण करते. नवे क्रिस्टा मॉडेल 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध याशिवाय, क्रिस्टाचे नवे मॉडेल पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात सुपर व्हाइट, अ‍ॅटिट्यूड ब्लॅक मीका, अवंत गार्डे ब्रॉन्झ, सिल्व्हर मेटॅलिक आणि प्लॅटिनम व्हाइट पर्ल यांचा समावेश आहे.


क्रिस्टा या गाड्यांना देते टक्कर


टोयोटा इनोव्हा क्रिस्टा (Toyota Innova Crysta)सोबत स्पर्धेत असलेल्या वाहनांमध्ये MG हेक्टर प्लस, महिंद्रा XUV 700, टाटा सफारी (Tata Safari), महिंद्रा स्कॉर्पिओ (Mahindra Scorpio) आणि टाटा हॅरिअर (Tata Harrier) यांचा समावेश आहे.


संबंधित बातम्या:


Mahindra Thar : महिंद्रा थारचे लवकरच नवीन डिझाइन; आंतरराष्ट्रीय बाजारात लाँचिंगसाठी तयार


Car loan Information:

Calculate Car Loan EMI