Grand Vitara Hybrid : प्रसिद्ध कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आपली मध्यम आकाराची हायब्रिड SUV कार ग्रॅंड विटारा (Grand Vitara) सप्टेंबरच्या महिन्याच्या अखेरीस भारतात लॉन्च करणार आहे. या कारचे बुकिंग 11 जुलैपासून सुरू झाले असून आतापर्यंत 50,000 हून अधिक लोकांनी या कारचे बुकिंग केले आहे. या कारची निर्मिती मारूतीने टोयोटाच्या सहकार्याने केली आहे. मारुती कंपनी या कारची विक्री Nexa डीलरशिपच्या अंतर्गत करणार आहे.
ग्रॅंड विटारामध्ये 'हे' फिचर्स असू शकतात
ग्रॅंड विटारा हायब्रिड ही कार लाईट हायब्रिड आणि स्ट्राँग हायब्रिड अशा दोन पॉवरट्रेनच्या माध्यमातून लॉन्च केली जाईल. ज्यामध्ये 1.5-L K15C पेट्रोल इंजिन 103bhp च्या पॉवर क्षमतेसह सौम्य हायब्रिड व्हर्जनमध्ये दिसेल आणि मजबूत हायब्रिड व्हर्जनमध्ये 1.5L TNGA ऍटकिन्सन सायकल इंजिन वापरले जाईल. हे इंजिन 115bhp ची पॉवर निर्माण करेल. सौम्य हायब्रिड व्हर्जनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा ऑप्शन मिळेल. तर eCVT गिअरबॉक्स स्ट्राँग हायब्रिड व्हर्जनमध्ये दिला जाईल. कंपनीच्या मते, या व्हेरिएंटमधून 27.97kmpl पर्यंत मायलेज मिळू शकते. ग्रँड विटाराच्या लाईट हायब्रिड व्हर्जनला टू व्हील ड्राईव्ह मॅन्युअलमधून 21.11kmpl, टू व्हील ड्राईव्ह ऑटोमॅटिकमधून 20.58kmpl आणि AllGrip ऑल व्हील ड्राईव्हवरून 19.38kmpl मायलेज मिळेल.
किंमत किती?
मारुती ही मध्यम आकाराची एसयूव्ही (SUV) सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा या चार ट्रिम्समध्ये लॉन्च करेल. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन अशा ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. मिळालेल्या माहितीनुसार, या कारची किंमत 9.50 लाख रुपयांपासून ते 18 रुपयांपर्यंत असू शकते. ही कार लाईट हायब्रिड आणि स्ट्राँग हायब्रिड अशा दोन ऑप्शनमध्ये लॉन्च केली जाईल. ज्यामध्ये लाईट हायब्रिड व्हर्जनची किंमत 9.50 लाख ते 15.50 लाख रुपये आणि स्ट्रॉंग हायब्रिड आवृत्तीची किंमत 17 लाख ते 18 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. स्ट्रॉंग हायब्रिड टेक्नॉलॉजी फक्त Zeta+ आणि Alpha+ व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल अशी अपेक्षा आहे. मात्र, असे असले तरीही कंपनीने या संंदर्भात अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. कार लॉन्च झाल्यानंतर यामध्ये काही बदल होऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या :
- Tata Cars : टाटा कारवर बंपर डिस्काउंट! Tata Tiago ते Tata Safari पर्यंत 'या' कारचा यादीत समावेश
- Airbag Feature Cars in India : देशातील 10 टक्क्यांहून कमी कारमध्ये 6 एअरबॅगची सुविधा; जाणून घ्या कारण
Car loan Information:
Calculate Car Loan EMI