Airbag Feature Cars in India : उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर मागील आसनावर असलेल्या प्रवाशांच्या सुरक्षितेचा (Passenger Safety) मुद्दा ऐरणीवर आला आहे. सीट बेल्टसह एअरबॅगचे (Car AirBag) फिचर देण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. भारतात धावणाऱ्या काही मोजक्याच कारमध्ये 6 एअरबॅगची सुविधा आहेत. देशातील 10 टक्क्यांहून कमी कारमध्ये 6 एअरबॅगचे फिचर्स आहेत. उर्वरित कारमध्ये हे फिचर्स आढळून येत नाही. सुरक्षितेच्यादृष्टीने आवश्यक असणारे हे फिचर्स महागड्या कारमध्ये आढळून येते.
स्वस्त दरातील कारची मागणी
ऑटो क्षेत्रातील जाणकरांच्या मते, देशातील बहुतांशी कार ग्राहकांचा ओढा हा स्वस्त कार घेण्याकडे असतो. त्यामुळे दोनपेक्षा अधिक एअरबॅगचा पर्याय असलेल्या कारचा बाजारपेठेतील हिस्सा अतिशय कमी आहे. देशात सध्या कोणत्याही कारमध्ये दोन एअरबॅगचे फिचर असते. दोन एअरबॅगचे फिचर असलेली कार इतर कारच्या तुलनेत स्वस्त असते. चार, सहा एअरबॅगचे फिचर आल्यास कारच्या किंमतीतही वाढ होऊ शकते.
काही वर्षांपूर्वी काही कंपन्यांकडून फक्त एकच एअरबॅग असलेल्या कारची विक्री करण्यात येत होती. त्यानंतर सरकारने सर्व कारमध्ये दोन एअरबॅग असणे अनिवार्य केले. त्यानंतर जानेवारी महिन्यांपासून सगळ्याच कार कंपन्यांनी किमान दोन एअरबॅगचे फिचर देण्यास सुरुवात केली आहे.
कार चालवताना अपघात झाल्यास समोरील सीटवर असलेल्या कार चालक आणि सहप्रवाशाला अधिक धोका असतो. त्यामुळे कारच्या पुढील भागात दोन एअरबॅगचे फिचर दिले जात आहे. केंद्र सरकारनेही दोन एअरबॅग अनिवार्य केल्या आहेत.
सीट बेल्टही आवश्यक
कारच्या पुढील भागात एअरबॅग असल्या तरी सुरक्षितेसाठी सीट बेल्ट अनिवार्य आहे. मागील काही महिन्यात लाँच होत झालेल्या कारमध्ये सीट बेल्ट न लावल्यास अलार्म वाजतो. त्यामुळे अनेकजण सीट बेल्ट लावतात. भारतात जगाच्या तुलनेत वाहनांचे प्रमाण फक्त एक टक्के इतकेच आहे. मात्र, अपघातात होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण 11 टक्के आहे.
ऑटो उद्योगाचे काय म्हणणं?
सरकारकडून सर्वच कारमध्ये सेफ्टी फिचर्स देण्यासाठी कार कंपन्यांवर दबाव वाढत आहे. तर, दुसरीकडे ऑटो क्षेत्रातील एका गटाने अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सीट बेल्ट अनिवार्य करणे, ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह, वेग मर्यादा, चुकीच्या मार्गिकेतून ड्रायव्हिंग आदी मुद्यांवर भर देत नियमांचे पालन केल्यास अपघात कमी होतील असेही त्यांनी म्हटले.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI