Maruti Baleno Cross : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती-सुझुकी (Maruti Suzuki) भारतात सतत नवीन कार लॉन्च करत आहे. नवीन Brezza, Alto K10 आणि Grand Vitara नंतर आता मारुती लवकरच आपली नवीन कार Baleno Cross भारतात सादर करू शकते. सध्या कंपनी या कारची चाचणी करत आहे. ही नवीन कार मारुतीच्या लाईटवेट हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही नवी कार ग्रँड विटारासारखी (Grand Vitara) असू शकते. पुढील वर्षी ऑटो एक्स्पोमध्ये या कारचे लॉन्चिंग होण्याची शक्यता आहे.  


बलेनो क्रॉस इंजिन (Maruti Baleno Cross Engine) :


नवीन बलेनो क्रॉसमध्ये 1.2-लिटर ड्युअलजेट किंवा 1.5-लिटर इंजिन (Engine) लाईट-हायब्रिड टेक्नॉलॉजीसह दिसू शकते. या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल. यात ट्रॅपेझॉइडल फ्रंट ग्रिल, रूफ-इंटिग्रेटेड स्पॉयलर, शार्क फिन अँटेना आणि अलॉय व्हील देखील मिळू शकतात. 


बलेनो क्रॉसची वैशिष्ट्ये (Maruti Baleno Cross Features) :


360-डिग्री कॅमेरा सिस्टम, नऊ-इंच फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सिस्टम, एक हेड-अप डिस्प्ले, ऍपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी यांसारखी वैशिष्ट्ये नवीन बलेनो क्रॉसमध्ये दिली जाऊ शकतात. याशिवाय, यात सुरक्षा वैशिष्ट्ये म्हणून सहा एअरबॅग देखील मिळतील. ही कार प्रीमियम Nexa डीलरशिप अंतर्गत विकली जाईल. 


बलेनो क्रॉस किंमत (Maruti Baleno Cross Price) :


सध्या या कारच्या किंमतीबाबत (Price) कोणतीही अधिकृत माहिती सांगण्यात आली नाही. परंतु, कारमधील एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि इतर सर्व वैशिष्ट्यांसह सौम्य-हायब्रीड तंत्रज्ञानाची शक्यता लक्षात घेता, त्याची किंमत सुमारे 8 लाख रुपये असू शकते. मारुती सुझुकीने पुढील वर्षासाठी ऑटो एक्सपोमध्ये बलेनो क्रॉसचे अनावरण केले, तर ही कार मार्च 2023 पर्यंत लॉन्च केली जाऊ शकते. लॉन्च झाल्यानंतर ही कार भारतीय बाजारपेठेत टाटा पंच, रेनॉल्ट चिगर, सिट्रोएन सी3 आणि निसान मॅग्नाईटला टक्कर देण्याची शक्यता आहे. 


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI