Maruti Suzuki Car Discount Offers: देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki ) नवीन वर्षापासून वाहनांच्या किमती वाढवणार (Maruti Suzuki Price Hike) आहे. मात्र याआधी कंपनीने आपल्या गाड्यांवर भरघोस सूट देऊन स्टॉक क्लिअर करण्याची योजना आखली आहे. डिसेंबर 2022 मध्ये मारुती निवडक कार मॉडेल्सवर 52,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. या सवलतींमध्ये अॅक्सेसरीज आणि कॉम्प्लिमेंटरी सर्व्हिस, एक्सचेंज बेनिफिट्स, रोख सवलत आणि कॉर्पोरेट ऑफर यांसारखे फायदे समाविष्ट आहेत. कंपनीने या ऑफरमध्ये Ertiga, Brezza, XL6 आणि Grand Vitara सारखे मॉडेल समाविष्ट केलेले नाहीत. वर्षाच्या शेवटी ग्राहक मारुतीच्या कारवर किती बचत करू शकता हे जाणून घेऊ.


Maruti Alto K10 Discount Offer: मारुती अल्टो K10 


मारुती नवीन Alto K10 वर एकूण 52,000 रुपयांच्या सूट देत आहे. यामध्ये 30,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, 15,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट यासारख्या फायद्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ऑटोमॅटिक व्हेरियंटवर 22,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. तर CNG व्हेरियंटवर ग्राहक 45,100 रुपयांची बचत करू शकतात.


Maruti Celerio Discount Offer: मारुती सेलेरियो 


डिसेंबरमध्ये मारुती सेलेरियोवरही मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. या हॅचबॅक सीएनजी प्रकारावर कमाल 45,100 रुपयांची सूट दिली जात आहे. तर मॅन्युअल व्हेरियंटवर 36,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. Celerio च्या ऑटोमॅटिक व्हेरियंटवर 21,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.


Maruti Suzuki Wagon R Discount Offers: मारुती वॅगनआर 


कंपनी WagonR आणि Alto 800 वर 42,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. या महिन्यात स्विफ्ट हॅचबॅक (Hatchback Cars) आणि डिझायर सबकॉम्पॅक्ट सेडानवर 32,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.


दरम्यान, कंपनी जानेवारी 2023 पासून आपल्या प्रवासी वाहनांच्या (Car) किमती वाढवण्याच्या तयारीत आहे. नियामक फाइलिंगमध्ये कंपनीने म्हटले आहे की, महागाई वाढल्यामुळे कंपनी जानेवारी 2023 पासून आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ करणार आहे. कारच्या मॉडेल आणि व्हेरियंटनुसार किंमतीत वाढ होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maruti Suzuki Recalls Vehicles: मारुतीच्या 9125 हून अधिक गाड्यांमध्ये आढळला दोष, 'या' गाड्या परत मागवल्या, तुमच्या कारचाही समावेश?


Car loan Information:

Calculate Car Loan EMI