Anand Mahindra : महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे देशातील दिग्गज उद्योगपतींपैकी एक आहेत. ते ट्विटरवर खूप सक्रिय असतात. ते नेहमीच तरूणांसोबत कनेक्ट राहण्याासठी समाजातील विविध विषयांवरील व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात. त्यांच्या काही पोस्ट मजेशीरही असतात. या मजेशीर पोस्ट्समुळे ते सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. अलिकडे त्यांनी अशीच मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट खूपच चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसंत आहे. फक्त 12 हजार 421 रुपयांमध्ये जीप मिळत असल्याचे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले आहे. परंतु, त्यांनी शेअर केलेल्या जाहीरातीचा फोटो जुना आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केलेली जाहीरात 1960 ची आहे. या ट्विटमध्ये आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे की, महिंद्र अँड महिंद्रा विलीज मॉडेल CJ 3B जीपच्या किंमतीत दोनशे रूपयांची कपात करत असताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आता ही जीप 12 हजार 421 रुपयांना मिळणार असल्याचे महिंद्रा यांनी म्हटले आहे. त्यांनी शेअर केलेली जाहीरात टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती.
"एक चांगला मित्र आणि कुटुंब खूप काळापासून आमच्यासाठी काम करत आहे. त्यांनी त्यांच्या आठवणीतून एक चांगली जाहिरात काढली आहे. या जाहिरातीमुळे ते जुने दिवस आठवले, असे महिंद्रा यांनी म्हटले आहे. 1960 च्या काळात महिंद्रा अँड महिंद्रा भारतात परवानगी घेऊन विली जीपचे उत्पादन करत असे. जीप CJ-3B चे उत्पादन 15 वर्षे करण्यात आले. 1968 पर्यंत या मॉडेलच्या एक लाख 55 हजार जीप विकल्या गेल्या होत्या. सध्या जीप हा ब्रँड फियाट क्रायल्सर मोटर्स (FCA) च्या मालकीचा आहे.
दरम्यान, आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही मजेदार कमेंट्स दिल्या आहेत. सध्या आम्ही ही जीप घेऊ शकतो काय? असे प्रश्न नेटकऱ्यांनी विचारले आहेत. नेटकऱ्यांच्या या प्रश्नालाही आनंद महिंद्रा यांनी मजेदार उत्तरे दिली आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Anand Mahindra : उद्योगपती आनंद महिंद्रांचं नवं पाऊल; आता सुरु करणार मेडिकल काॅलेज
- Anand Mahindra यांनी शब्द पाळला! सांगलीच्या रॅन्चोला मिनी जिप्सीच्या बदल्यात मिळाली Bolero
- ना हात, ना पाय... दिव्यांग रिक्षाचालक पाहून आनंद महिंद्रा अवाक्, दिली 'ही' ऑफर
Car loan Information:
Calculate Car Loan EMI