Sangli : Anand Mahindra यांनी शब्द पाळला! सांगलीच्या रॅन्चोला मिनी जिप्सीच्या बदल्यात मिळाली Bolero
महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी आपला शब्द पाळला. सांगलीच्या रॅन्चोला मिनी जिप्सीच्या बदल्यात मिळाली नवी कोरी बोलेरो. दत्तात्रय लोहार यांचे चारचाकीचे स्वप्न खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरलय , लोहार कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत, दत्तात्रय लोहार यांच्या मिनी जिप्सीच्या महिंद्रांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. भंगाराचं साहित्य, दुचाकीचे पार्ट्सने लोहार यांनी मिनी जिप्सी तयार केली होती. एका हाताने अपंग दत्तात्रय लोहार यांचा भन्नाट प्रयोग राज्यभर चर्चेत होता