Anand Mahindra : गेल्या काही दिवसांपासून रशिया युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) सातत्याने युद्ध सुरु आहे. याच युद्धाचा परिणाम भारतीय विद्यार्थ्यांवरही झाला आहे. रशिया युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. या युद्धात आतापर्यंत अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर दोन विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. वैद्यकीय शिक्षणाच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra Chairperson of Mahindra and Mahindra) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच भारतात वैद्यकीय महाविद्यालय (Medical College) सुरु करणार अशी माहिती आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून दिली आहे.
या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, "भारतात वैद्यकीय महाविद्यालयांची इतकी कमतरता आहे याची मला कल्पना नव्हती. @C_P_Gurnani आपण मेडिकलच्या अभ्यासासाठी महिंद्रा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मेडिकल कॉलेज सुरु करू शकतो का?" अशी माहिती दिली आहे. टेक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सीपी गुरनानी यांना त्यांनी टॅग केले आहे.
भारतातून मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्यांची संख्या फार जास्त आहे. तसेच, बरेचसे विद्यार्थी पैशांच्या कमतरतेमुळे अशा रशिया युक्रेनसारख्या छोट्या छोट्या देशांत शिक्षण घेण्याचा पर्याय निवडतात. या सगळ्या तणावात उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे नक्कीच त्याचा लाभ भारतीय विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच त्यांना आपल्या मायदेशात राहून शिक्षण घेता येणार आहे.
युक्रेनमधून भारतीयांच्या मायदेशी परतण्याचे अभियान सुरूच
युक्रेनमधून भारतीयांच्या मायदेशी परतण्याचे अभियान सुरू आहे. आज, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या भारतीय हवाई दलाची दोन सी-17 विमाने रोमानियामधील बुखारेस्ट आणि हंगेरीमधील बुडापेस्ट येथून गाझियाबादमधील हिंडन हवाई तळावर पोहोचली. केंद्रीय राज्यमंत्री अजय भट्ट यांनी भेट देणाऱ्या भारतीय नागरिकांचे स्वागत केले. रात्री उशिरा सुमारे 700 विद्यार्थी हवाई दल आणि एअर इंडियाच्या विमानाने देशात परतले आहेत. उद्या म्हणजेच 5 मार्चपर्यंत आणखी 15 हजार मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न असणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Russia Ukraine War : 'यूक्रेनमध्ये मेडिकल शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करा', महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे निर्देश
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याबाबत कोणताही करार नाही, लवकरच चर्चेच्या तिसऱ्या फेरीची शक्यता
- Russia Ukraine War: युक्रेननं भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवलं, रशियाचा आरोप; मदतीसाठी सरसावणार!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha