Mahindra XUV 400 EL Update : भारतीय ऑटोमेकर कंपनी Mahindra & Mahindra 2024 मध्ये भारतात बॉर्न-इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्म-आधारित SUV सादर करणार आहे. सध्या, XUV400 कंपनीच्या EV पोर्टफोलिओमध्ये आहे, जे अपडेटेड XUV300 प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. XUV300 कॉम्पॅक्ट SUV देखील मोठ्या अपडेटसह लवकरच लॉन्च केली जाईल. यात पॅनोरॅमिक सनरूफसह पूर्णपणे नवीन इंटीरियर मिळेल, जे अनेक नवीन वैशिष्ट्यांसह उपलब्ध असेल. अपडेटेड XUV 400 ला पॅनोरॅमिक सनरूफ मिळण्याची अपेक्षा आहे, जी 2025 मध्ये लॉन्च केली जाईल. 


अपडेटेड इलेक्ट्रिक एसयूव्ही कशी असेल?


महिंद्राने XUV400 इलेक्ट्रिक SUV च्या टॉप-स्पेक EL व्हेरियंटमध्ये अनेक नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये आणि इतर आरामदायी वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे. Mahindra XUV 400 या कारची एक्स-शोरूम किंमत 19.19 लाख रुपयांपासून सुरू होते. टॉप-स्पेक EL ट्रिममध्ये आता इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड असिस्ट, ऑटो-डिमिंग IRVM, क्रूझ कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, बूट लॅम्प, फॉग लॅम्प आणि दोन ट्वीटरसह 4 स्पीकर सिस्टमसह सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.


बॅटरी आणि रेंज किती असेल?


Mahindra XUV400 EL ट्रिमला समोरच्या एक्सलवर एकच इलेक्ट्रिक मोटर बसवली जाते, जी 150 hp पॉवर आणि 310 Nm टॉर्क जनरेट करते. ही फ्रंट-एक्सल माउंट केलेली मोटर 39.4kWh बॅटरी पॅकशी जोडलेली आहे. या कारमध्ये तुम्हाला प्रति चार्ज 456 किमीची रेंज मिळेल असा दावा करण्यात आला आहे. त्याच्या एंट्री-लेव्हल EC ट्रिमला 34.5kWh बॅटरी पॅक मिळतो, जो प्रति चार्ज 375 किमीची रेंज ऑफर करतो. 


किंमतीत झाली वाढ


अपडेटेड Mahindra XUV 400 ईएल ट्रिमच्या किंमती 20,000 रुपयांनी वाढल्या आहेत. बेस EC ट्रिमची एक्स-शोरूम किंमत 15.99 लाख रूपयांपासून सुरु होते ती 16.49 लाख रूपयांपर्यंत आहे. EL ट्रिमची एक्स-शोरूम किंमत 19.19 लाख रूपयांपासून सुरु होते ती 19.39 लाख रूपयांपर्यंत इतकी आहे.


'या' कारशी होणार स्पर्धा 


Mahindra XUV 400 ही इलेक्ट्रिक एसयूव्ही बाजारात टाटा नेक्सॉन ईव्ही मॅक्सशी स्पर्धा करणार आहे. टाटा नेक्सॉन सध्या देशात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. याची रेंज प्रति चार्ज 453 किलोमीटर असल्याचा दावा करण्यात आला आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Ducati Diavel v4 Rivals : 'या' मजबूत बाईक कंपनीचा अभिनेता रणवीर सिंह ब्रँड अॅम्बेसेडर; भारतात लाँच केली दमदार बाईक


Car loan Information:

Calculate Car Loan EMI