Ducati Diavel v4 Launched in India : Ducati India ने भारतीय बाजारपेठेत 25.91 लाख एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किंमतीत आपली नवीन बाईक Diavel V4 लॉन्च केली आहे. तर, Ducati Diavel V4ची डिलिव्हरी लवकरच नवी दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोची, कोलकाता, अहमदाबाद आणि चंदीगड येथील सर्व डुकाटी स्टोअर्सवर सुरू होईल असे कंपनीने सांगितलं आहे. याशिवाय डुकाटी इंडियाने बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहला आपला अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे.


दोन कलर ऑप्शन


Ducati Diavel V4 दोन कलर ऑप्शन उपलब्ध केले आहेत. Ducati Red आणि Thrilling Black. बाईकची रचना पॉवर क्रूझर म्हणून केली गेली आहे. ज्यामध्ये 20 लीटर इंधन, एक फ्लॅट हेडलॅम्प, सिंगल-साईड स्विंगआर्म आणि साईड-माउंट एक्झॉस्ट ठेवता येईल. खरंतर, Diavel V4 त्याच्या डिझाईनसाठी खूप प्रसिद्ध आहे.


1,158cc V4 Granturismo इंजिन


Ducati Diavel V4 मध्ये 1,158cc V4 GranTurismo इंजिन आहे .हे 10,750rpm वर 165bhp आणि 7,500rpm वर 126Nm चे पीक टॉर्क आउटपुट जनरेट करते. हे क्विक-शिफ्टर आणि ऑटो-ब्लिपरसह 6-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. कंपनीने इंजिनला 168 एचपी आणि 126 एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यासाठी ट्यून केले आहे. बाईकला 3 पॉवर-मोड्ससह चार राइडिंग मोड (स्पोर्ट, टूरिंग, अर्बन आणि वेट) देखील मिळतात.




त्याच्या ठळक वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, बाईकला 50 mm USD फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक युनिट मिळते. दोन्ही पूर्णपणे समायोज्य आहेत. ब्रेकिंगसाठी, पुढच्या चाकावर डबल 330 मिमी डिस्क आणि मोनोब्लॉक कॅलिपर देण्यात आले आहेत.  डायब्लो रोसो III टायर बाईकमध्ये उपस्थित असलेल्या 17-इंचाच्या ड्युअल-टोन अलॉय व्हीलवर वापरण्यात आले आहेत.




या बाईकच्या डिझाईनमध्ये, तुम्हाला हॉर्सशूच्या आकाराचा LED DRL, रीडिझाइन केलेला हेडलॅम्प, शेपटीच्या खाली मल्टी-पॉइंट एलईडी टेल लॅम्प, इंटिग्रेटेड इंटिग्रेटेड फ्रंट फ्लॅशर आणि एक युनिक मस्क्युलर क्वाड एक्झॉस्ट सिस्टीम मिळते, जी तिला मस्क्यूलर लुक देण्यासाठी काम करते.


वैशिष्ट्ये काय आहेत?


वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात 5-इंचाचा TFT कलर डिस्प्ले आहे, ज्यामध्ये डुकाटी मल्टीमीडिया सिस्टम आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन देखील उपलब्ध आहे. इतर वैशिष्ट्यांमध्ये रायडिंग मोड, पॉवर मोड, डुकाटी ट्रॅक्शन कंट्रोल, डुकाटी व्हीली कंट्रोल, डेटाइम रनिंग लाइट्स, डुकाटी ब्रेक लाइट्स, क्रूझ कंट्रोल, सर्व एलईडी लाइटिंग, डायनॅमिक टर्न इंडिकेटर आणि बरेच काही समाविष्ट आहे.


'या' बाईकला देणार टक्कर 


Ducati Diavel v4 शी स्पर्धा करणाऱ्या बाईक्समध्ये Kawasaki Ninja ZX 10R, Suzuki Hayabusa, Harley Davidson 48, Indian Motorcycle Scout Bobber या बाईक्सचा समावेश आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


Virtus Alpha: जबरदस्त रेंज... फास्ट चार्जिंग सपोर्ट; फक्त 16 हजार रुपयांची इलेक्ट्रिक सायकल लॉन्च


Car loan Information:

Calculate Car Loan EMI