Kia Carens  : कार मेकर किआ इंडियाने आज तिच्या 3-रो रिक्रिएशनल व्हेइकल किआ कॅरेन्सची प्री-लॉन्च बुकिंगच्या तारखेची घोषणा केली. 14 जानेवारी 2022 पासून किआ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही बुकिंग करु शकणार आहात. ही गाडी  ESC & VSM सह बळकट 10 उच्च सुरक्षा पॅकेज अंतर्गत 9 अतिरिक्त सुरक्षा फीचर्ससह सर्व प्रकारात 6 एयर बॅग्ज आहेत.   


सोबतच देशभरातील अधिकृत डिलरशीप नेटवर्कमधून अवघ्या 25,000 रुपये किंमत भरून ही कार बूक करू शकणार आहात. सोनेट आणि सेल्टोसप्रमाणे कॅरेन्स ही 'जगासाठी भारतात तयार झालेले' प्रॉडक्ट आहे आणि त्यामध्ये सर्वोत्तम फिचर्स सुद्धा आहेत. भारतीय बाजाराशिवाय किआ कॅरेन्स उजव्या आणि डाव्या बाजूच्या ड्रायव्हींग असलेल्या बाजारांमधील 90 देशांमध्ये सुद्धा निर्यात होईल.


किआ कॅरेन्सचे बूकींग ग्राहक 14 जानेवारी 22 च्या मध्यरात्रीपासून या लिंकवर जाऊन करू शकतात– https://www.kia.com/in/buy/pre-booking.html


किआ कॅरेन्सची वैशिष्ट्ये


* किआ कॅरेन्समध्ये 10 बळकट उच्च सुरक्षा पॅकेज आहेत.


* 6 एयरबॅग, प्रीमियम, प्रेस्टीज, प्रेस्टीज प्लस, लक्झरी आणि लक्झरी प्लस या सर्व पाच प्रकारांमध्ये प्रमाणित आहे. 


* व्हेईकलमध्ये 66 कनेक्टेड कार फिचर्स सह किआ कनेक्टच्या माध्यमातून अत्याधुनिक कनेक्टीव्हीटी आहे.


* सर्वात लांब व्हीलबेससह पॉवरट्रेन्स आणि ट्रान्समीशन पर्यायांची निवड सुद्धा आहे. 


* व्हेईकलमध्ये बरेच सर्वोत्तम फिचर्स आहेत जसे की, 


नेक्स्ट जनरेशन किआ कनेक्टसह 26.03 सेमी (10.25”) एचडी टचस्क्रीन नेव्हीगेशन, 


8 स्पीकरसह बोस प्रीमियम साऊंड सिस्टीम, व्हायरस आणि बॅक्टेरीयापासून संरक्षण देणारे एयर प्युरिफायर, हवेशीर समोरील सीट, 


2 ओळीतील सीट "वन टच इझी इलेक्ट्रीक टंबल" आणि स्कायलाईट सनप्रुफ. 


किआ कॅरेन्स तीन पॉवरट्रेन पर्यायांमध्ये येईल - स्मार्टस्क्रीम 1.5 पेट्रोल, स्मार्टस्ट्रीम 1.4 T-GDi पेट्रोल, 


1.5 CRDi VGT डिझेल जे तीन ट्रान्समीशन पुढील पर्यायांमध्ये येते - 6MT, 7DCT आणि 6AT.


महत्त्वाच्या बातम्या : 



 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI