Vespa Scooter : जर तुम्ही कॅनेडियन पॉप सिंगर जस्टिन बीबरचे (Justin Bieber) चाहते असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. इटालियन ऑटो क्षेत्रातील कंपनी Piaggio ची भारतीय उपकंपनी Piaggio Vehicles ने भारतातील सर्वात लोकप्रिय Vespa स्कूटरची Justin Bieber X एडिशन लॉन्च केली आहे. खरंतर, 2022 मध्ये कंपनीने ही स्कूटर सर्वप्रथम जागतिक स्तरावर लॉन्च केली होती पण आता ही स्कूटर भारतीयांसाठी सादर करण्यात आली आहे. कंपनीने या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 6.45 लाख रुपये ठेवली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Vespa चे हे व्हेरिएंट कॅनेडियन म्युझिक पॉप स्टार Justin Bieber ने डिझाईन केलं आहे. ही स्कूटर भारतीय बाजारपेठेत पूर्णपणे बिल्ड युनिट (CBU) म्हणून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असेल. तसेच, ग्राहकांना जर ही स्कूटर बुक करायची असेल तर अधिकृत वेबसाईट किंवा भारतातील सर्व Vespa डीलरशिपला भेट देऊन प्री-बुक करू शकता.


Justin Bieber एक्स वेस्पा स्पेशल एडिशन स्कूटर डिझाईन कसं असेल?


Justin Bieber ने डिझाईन केलेली नवीन व्हेस्पा स्कूटर व्हाईट कलरच्या ऑप्शनसह मोनोक्रोम स्टाईलमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये सॅडल, ग्रिप आणि व्हील स्पोक देखील व्हाईट कलरमध्ये मिळतात. तसेच, ब्रँडच्या लोगोसह, स्कूटरवर तयार करण्यात आलेले डिझाईन देखील टोन-ऑन-टोन व्हाईट कलरमध्ये आहे.


जस्टिन बीबर x वेस्पा स्पेशल एडिशन स्कूटर इंजिन आणि वैशिष्ट्ये कोणती आहेत?


जस्टिन बीबर x वेस्पा स्पेशल स्कूटरचे वैशिष्ट्य पाहता यामध्ये स्कूटरला आयताकृती आकाराचे हेडलाईट, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह कलरफुल मल्टीफंक्शनल TFT डिस्प्ले आणि 12-इंच व्हिल्स देण्यात आले आहेत. तसेच, यामध्ये स्कूटरच्या दिलेल्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, भारतासाठी बनवलेल्या जस्टिन बीबर एक्स वेस्पा व्हेरिएंटमध्ये 150 सीसी इंजिन मिळते, जे स्कूटरला जास्तीत जास्त 12.5 एचपी पॉवर आणि 12.4 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते आणि आता जर त्याची ब्रेकिंग सिस्टम असेल तर सस्पेन्शनबद्दल बोलायचे झाले तर सिंगल-चॅनल ABS सह 200 mm फ्रंट डिस्क ब्रेक आणि 140 mm रियर ड्रम ब्रेक मिळतो.


'या' स्कूटरशी करणार स्पर्धा 


भारतात, टाटा आणि ह्युंदाईने अलीकडेच आपल्या मायक्रो एसयूव्ही सादर केल्या आहेत. किंमतीच्या बाबतीत, ह्युंदाईची मायक्रो एसयूव्ही एक्सेटर आणि टाटा पंच जवळजवळ सारखीच आहेत. या स्कूटरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6 लाख रुपये आहे. तर, जस्टिन बीबर x वेस्पा स्पेशल या स्कूटरची किंमत या वाहनांच्या तुलनेत थोडी जास्त आहे. कंपनीने जस्टिन बीबर x वेस्पा स्पेशल या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 6.45 लाख रुपये ठेवली आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Mahindra Bolero Electric : नवीन डिझाईन आणि दमदार लूकसह महिंद्रा बोलेरो एसयूव्हीचे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च होणार; 'हे' असेल खास वैशिष्ट्य


Car loan Information:

Calculate Car Loan EMI