Ola Electric Launches Most Affordable Scooter : आजकाल Electric गाड्यांची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. एकिकडे पेट्रोलचे भाव वाढत आहेत. अशा वेळी Electric गाडी अनेक लोकांकरता सोयीस्कर होते. अशातच OLA Electric ने Ola S1 Pro लाँच केली आहे. भारतात सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक स्कूटर आणखीन चांगल्या फिचर्ससह लाँच करण्यात आली आहे. ओला इलेक्ट्रिकने बेंगळुरू येथे एका मेगा इव्हेंटमध्ये 79,000 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीसह दुसऱ्या पिढीचे मॉडेल Ola S1 Pro सादर केले.


काय आहेत फिचर


OLA इलेक्ट्रिकचे फ्लॅगशिप प्रोडक्ट S1 प्रो च्या सेकंड जनरेशन मॉडेलचे वजन जुन्या मॉडेलपेक्षा 6 किलो कमी आहे, त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की त्यात बरेच बदल करण्यात आले आहेत. ट्यूबलर आणि स्टील मेटल फ्रेमवर बनवलेल्या, प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक ट्विन सस्पेंशन, मागील बाजूस मोनोशॉक सस्पेन्शन, सीबीएस ब्रेकिंग सिस्टीम, पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक, 12-इंच अलॉय व्हील्स, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, टेललॅम्प आदी फिचर देण्यात आले आहेत.


Ola S1 Pro Gen 2 मध्ये 4 kWh लिथियम-आयन बॅटरी आहे, जी एका चार्जवर 195 किलोमीटर धावते. इको मोडमध्ये याची रेंज 180 किमी आणि नॉर्मल मोडमध्ये 143 किमी आहे. त्याची बॅटरी 6.5 तासांत घरबसल्या पूर्ण चार्ज होऊ शकते. Ola S1 Pro चा टॉप स्पीड आता 120 kmph पर्यंत आहे आणि तो फक्त 2.6 सेकंदात 0-40 kmph वरून जाऊ शकतो. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये हायपर, स्पोर्ट्स, इको आणि नॉर्मल असे रायडिंग मोड देण्यात आले आहेत. तर इतर फिचरमध्ये पार्क असिस्ट, रिव्हर्स मोड, 7-इंचाचा TFT डिस्प्ले, डिजिटल की, ब्लूटूथ आणि GPS कनेक्टिव्हिटी, क्रूझ कंट्रोल आणि अॅप कंट्रोल यांचा समावेश आहे. Ola S1 Pro ची डिलिव्हरी पुढील महिन्यापासून सुरू होईल आणि बुकिंग आधीच सुरू झाली आहे.


Ola Move OS 4 लॉन्च


ओला इलेक्ट्रिकने Move OS 4 देखील ज्यात अतिशय भन्नाट फिचर्स पाहायला मिळणार आहेत. ओला मॅप्स, हिल डिसेंट, माय स्कूटर , लोकेशन पुश, एचसी राउटिंग, मेगाफोन, कॉन्सर्ट मोड,टेक मी होम लाइट्स, ऑटो टर्न ऑफ इंडिकेटर, राइड एंड एनर्जी स्टॅट्स, कॉल फिल्टर, बायोमेट्रिक अनलॉक, विजेट्स, डार्क मोड आणि स्कूटर लोकेटर सारखे फिचर मिळणार आहेत.


संबंधित बातमी: 


Mahindra Bolero Electric : नवीन डिझाईन आणि दमदार लूकसह महिंद्रा बोलेरो एसयूव्हीचे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च होणार; 'हे' असेल खास वैशिष्ट्य


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI