Innova Crysta Diesel : प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपन्यांपैकी टोयोटाने (Toyota) भारतात सर्वात जास्त विकल्या जाणार्या SUV इनोव्हा क्रिस्टाच्या डिझेल (Innova Crysta Diesel) व्हेरिएंटचे बुकिंग काही महिन्यांसाठी बंद केले आहे. त्यामुळे आता ही कार फक्त पेट्रोल व्हेरिएंटसाठी बुक केली जाऊ शकते. टोयोटा कंपनीचा हा निर्णय धक्कादायक आहे. याचा अर्थ असा आहे की, पेट्रोल इंजिन मॉडेलचे बुकिंग जरी सुरु असले तरी मात्र, नवीन इनोव्हा क्रिस्टा कार यापुढे भारतीय रस्त्यावर दिसणार नाही.
नेमकं कारण काय?
इनोव्हा क्रिस्टा या कारच्या किंमतीत वाढ होऊनही तिची लोकप्रियता कमी झालेली नाही. त्यामुळे हा निर्णय आश्चर्यकारक आहे. परंतु, असे मानले जाते की, आगामी नवीन जनरेशनमधील इनोव्हा आणण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. कारचं नवीन मॉडेल साधारण पेट्रोल हायब्रिड पॉवरट्रेन किंवा डिझेल इंजिनमध्ये काही बदलांसह येऊ शकते. टोयोटाने याबाबत मात्र कोणताही खुलासा केलेला नाही. कारची पुढची जनरेशन इनोव्हा पुढच्या वर्षी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि सध्याच्या इनोव्हा क्रिस्टा सोबत विकली जाऊ शकते असाही अंदाज वर्तवला जात आहे.
कंपनीचा विचार काय?
टोयोटा हायब्रिडवर दिसल्याप्रमाणे पुढच्या पिढीतील इनोव्हाला हायब्रिड पॉवरट्रेनसह आणले जाऊ शकते. तसेच येणाऱ्या काळात ते टोयोटा फॉर्च्युनरसह बदलू शकते. नवीन प्लॅटफॉर्म, नवीन हायब्रीड पॉवरट्रेन आणि बरेच काही आलिशान इंटिरियर्सवर आधारित असलेल्या सध्याच्या मॉडेलपेक्षा पुढच्या जनरेशनमधील इनोव्हा खूप वेगळी असू शकते. मात्र, सध्याच्या इनोव्हा डिझेलच्या चाहत्यांना असे वाटते की नवीन इनोव्हामधून त्यांना सध्याच्या इनोव्हा क्रिस्टासारखेच समाधान मिळेल आणि कंपनी देखील आपल्या ग्राहकांना निराश करू इच्छित नाही.
नवीन जनरेशनची इनोव्हा कशी असेल?
डिझेल इंजिनवर आधारित असणाऱ्या इनोव्हाचे चाहते अजूनही भारतात आहेत. ज्यामुळे असे दिसते की, पेट्रोल इनोव्हा संभाव्य भविष्यात हायब्रिड मॉडेल्ससह बाजारपेठेची चाचणी घेण्यासाठी तसेच पुढील विस्तारासाठी पुन्हा बुकिंग केली जाऊ शकते. भारतातील डिझेल कारचे भवितव्य अजूनही प्रश्नार्थक आहे. परंतु, या कारची प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी पाहता डिझेल कार किती दिवस सुरू राहतील हे स्पष्ट नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Honda ने लॉन्च केली नवीन Activa Premium, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
- Hyundai Venue N-Line: Hyundai Venue N-Line लॉन्चसाठी सज्ज, स्पोर्टी लूकसह मिळणार जबरदस्त फीचर्स
Car loan Information:
Calculate Car Loan EMI