Delhi Driveless Vehicle : देशाची राजधानी दिल्लीमध्ये काही दिवसांनी तुम्हाला चालकविरहित वाहनं (Driverless Vehicle) धावताना दिसली तर नवलं वाटून घेऊ नका. आयआयटी दिल्लीनं आता नवीन उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाअंतर्गत IIT चालकविरहित गाड्यांची निर्मिती करणार आहे. IIT दिल्लीनं या उपक्रमासाठी काम करण्यास सुरुवात केली आहे. या वाहनामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा (Artificial Intelligence) वापर केला जाईल. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन या वाहनाची निर्मिती करण्यात येईल. तसेच यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचाही वापर केला जाईल. 


या उपक्रमासंदर्भात आयआयटीचे संचालक प्रोफेसर रंगन बॅनर्जी यांनी सांगितलं आहे की, देशात चालकविरहित वाहनांसाठी मोठी वाव आहे. त्यामुळे आयआयटीमधील वैज्ञानिकांनी यासंदर्भात संशोधन सुरु केलं आहे. त्यांनी पुढे म्हटलं आहे की, भारतात रस्त्यावर वाहन चालवणं अतिशय आव्हानात्मक आहे. यामुळे आयआयटीने हा नवीन उपक्रम सुरु केला आहे. IIT च्या या योजनेतील वाहनांची चाचणी सर्वात मोठ्या परिसरात केली जाईल. ज्यामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग निश्चित केला जाईल.  


आयआयटी संचालकांनी सांगितलं की, चालकविरहित हवाहन बनवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस सोबतच वाहनावर नियंत्रण यासारख्या सुविधांवर संशोधन सुरु आहे. यामध्ये थर्मोग्राफिक, कॅमरे, रडार, जीपीएस, ऑडोमीटर आणि प्रगत नियंत्रण प्रणाली असेल. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहा श्रेणी/नियामक आहेत. अमेरिकेतही चालकविरहित वाहनासाठी उपक्रम राबवण्यात आले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या



Car loan Information:

Calculate Car Loan EMI