Hyundai Electric Car : दक्षिण कोरियाची कार निर्माता Hyundai Motor कंपनी 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या 2023 ऑटो एक्सपोमध्ये अनेक नवीन मॉडेल्सचे अनावरण करण्याची शक्यता आहे. याशिवाय, पुढील जनरेशनची Verna Sedan आणि क्रेटा फेसलिफ्ट (Creata Facelift) देखील भारतीय ऑटो एक्सपोच्या 16 व्या व्हर्जनसह भारतात पदार्पण करू शकतात. एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, कंपनी या ऑटो इव्हेंटमध्ये नुकतीच सादर केलेली Ioniq 6 इलेक्ट्रिक सेडान देखील प्रदर्शित करण्याची शक्यता आहे.


ई-जीएमपी प्लॅटफॉर्मवर आधारित


ही कार पहिल्यांदा जून 2022 मध्ये सादर करण्यात आली होती. Ioniq 6 ही कंपनीची तिसरी इलेक्ट्रिक कार आहे. तर, Kona EV आणि Ioniq 5 या कंपनीच्या सुरुवातीच्याच कार आहेत. Hyundai Ioniq 6 हे कंपनीचे दुसरे असे उत्पादन आहे जे E-GMP स्केटबोर्ड आर्किटेक्चरवर आधारित आहे. Kia EV6 आणि Hyundai Ioniq 5 देखील याच प्लॅटफॉर्मवर तयार केले आहेत. हे स्केटबोर्ड आर्किटेक्चर, स्केलेबल बॅटरी आकार, मागील किंवा ऑल-व्हील ड्राइव्ह लेआउट, मोठी इंटर्नल स्पेस आणि विशेषतः ईव्हीसाठी योग्य आहे.  


लूक्स आणि इंटिरियर्स


Hyundai Ioniq 6 इलेक्ट्रिक सेडानला पारंपारिक ORVM च्या जागी फ्लश डोअर हँडल आणि कॅमेरे मिळतात. त्याच वेळी, या ईव्हीच्या मागील भागामध्ये डकटेल रिअर स्पॉयलर, पिक्सेल-शैलीतील एलईडी टेल-लाइट्स आणि वक्र शोल्डर लाइन आहे. केबिनच्या आत, सेडानला फ्लॅट सेंटर कन्सोल आणि इंफोटेनमेंट आणि ड्रायव्हर डिस्प्लेसाठी ड्युअल 12-इंच टचस्क्रीन आणि टू-स्पोक स्टीयरिंग व्हील मिळते. Ioniq 6 ची लांबी 4855mm, रुंदी 1880mm आणि उंची 1495mm आहे आणि 2950mm चा व्हीलबेस आहे.


पॉवरट्रेन कशी आहे?


नवीन Hyundai Ioniq 6 मध्ये 53 kWh आणि 77 kWh चे दोन बॅटरी पॅक पर्याय मिळतील. त्याचा ड्युअल मोटर सेटअप 302 bhp पॉवर आणि 605 Nm टॉर्क जनरेट करतो. RWD सेटअप 228 bhp पॉवर आणि 350 Nm टॉर्क जनरेट करतो. 53 kWh बॅटरीसह RWD व्हर्जन 429 किमीची रेंज ऑफर करण्यास सक्षम आहे. 77.4 kWh सह RWD व्हर्जन 614 किमीची रेंज देऊ शकते. त्याची AWD व्हर्जन 583 किमीची WLTP प्रमाणित रेंज ऑफर करण्यास सक्षम आहे.


टेस्ला मॉडेल 3 बरोबर स्पर्धा करणार


टेस्लाचे यूएस-स्पेक मॉडेल 3 तीन इलेक्ट्रिक पॉवरट्रेन पर्यायांसह ऑफर केले आहे, ज्यात स्टँडर्ड प्लस, लाँग रेंज आणि परफॉर्मन्स यांचा समावेश आहे. या कारची रेंज 423 किमी आहे, लाँग रेंज आणि परफॉर्मन्स व्हेरिएंट ड्युअल-मोटर ऑल-व्हील-ड्राइव्ह सेटअपसह येतात आणि अनुक्रमे 568 किमी आणि 507 किमीची रेंज देतात.


महत्त्वाच्या बातम्या : 


Bajaj Pletina BS6: 'मायलेज किंग' अपडेटेड अवतारात लॉन्च, रोजच्या प्रवासासाठी बेस्ट आहे 'ही' बाईक


Car loan Information:

Calculate Car Loan EMI