Hyundai i20 Price: गेल्या काही महिन्यांपासून देशातील जवळजवळ प्रत्येक कार उत्पादकाने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. परंतु याचदरम्यान दक्षिण कोरियाच्या कार ब्रँड ह्युंदाई मोटरने प्रीमियम हॅचबॅक कार i20 च्या किमती कमी केल्या आहेत. ही कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे.  कंपनीने i20 च्या Sportz Edition मॉडेलच्या किंमतीत ही कपात केली आहे. यानंतर आता Hyundai i20 Sportz ची एक्स-शोरूम किंमत 3,500 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आता देशात Hyundai i20 Sportz ची एक्स-शोरूम किंमत 8.05 लाख रुपये झाली आहे आणि i20 Sportz IVT ची एक्स-शोरूम किंमत 9.07 लाख रुपये झाली आहे.


Hyundai i20 Price: का केली किंमत कपात?


Hyundai i20 ही या सेगमेंटमधील इतर कारला टक्कर देत असून बाजारात तिची विक्रीही चांगली होत आहे. अशा परिस्थितीत काही लोकांना या कारच्या किमतीत कपात करणे विचित्र वाटू शकते. पण त्यामागे एक मोठं कारण दडलं आहे, ज्यामुळे या कारची किंमत कमी करण्यात आली आहे. कंपनीने आता या कारच्या Sportz प्रकारात आधीच अस्तित्वात असलेले ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल फीचर काढून टाकले आहे. त्याच्या जागी हीटरसह मॅन्युअल एसी दिले आहे. काही ग्राहकांना याचा फारसा फरक पडणार नाही, पण काही ग्राहकांना याची उणीव नक्कीच जाणवेल.


Hyundai i20 Price: पॉवरट्रेन कशी आहे?


Hyundai i20 स्पोर्ट्स ट्रिमच्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 1.2-लीटर, नॅच्युरल-एस्पिरेटेड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 81.8bhp पॉवर आणि 114.7Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन iVT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. 1.0-लिटर, टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनचा पर्याय देखील आहे. हे इंजिन 118.4bhp ची कमाल पॉवर आणि 172 Nm टॉर्क निर्माण करते.  यात ग्राहकांना चार एअरबॅग्स स्टँडर्ड आणि कर्टन एअरबॅग्स पर्याय म्हणून दिले आहेत. याशिवाय हॅचबॅकमध्ये ESC, स्टॅबिलिटी कंट्रोल, रियर-व्ह्यू कॅमेरा, हिल स्टार्ट असिस्ट, ऑटो हेडलॅम्प, टायर प्रेशर मॉनिटरिंग पर्याय मिळतील. 


दरम्यान, Hyundai Motor ने आता आपल्या hatchback कार i20 मधील 1.5-लिटर चार-सिलेंडर डिझेल इंजिन बंद केले आहे. याचे कारण म्हणजे आगामी रिअल ड्रायव्हिंग एमिशन (RDE) नियम. हा नवीन नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार. ह्युंदाईच्या बहुतांश गाड्यांमध्ये आता फक्त पेट्रोल इंजिनचा पर्याय उरला आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI