Hyundai Creta N Line Night Edition: दक्षिण कोरियाची वाहन उत्पादक कंपनी Hyundai ने ब्राझीलमध्ये Creta SUV चा N-Line Night Edition लॉन्च केला आहे. ही लिमिटेड एडिशन कार आहे. कंपनी याचे फक्त 900 युनिट्सची विक्री करणार आहे. या कारची किंमत BRL 181,490 (म्हणजे सुमारे 29 लाख रुपये) आहे. हा नवीन एडिशन Creta च्या फेसलिफ्ट मॉडेलवर आधारित आहे, जो भारतात 2024 साली लॉन्च होणार आहे. कंपनी आपल्या या कारमध्ये काय खास दिलं आहे, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ...


Hyundai Creta N Line Night Edition: काय आहे नवीन?


ब्लॅक-आउट ग्रिल, अलॉय व्हील्स, लोगो आणि डोअर हँडल क्रेटा एन-लाइन नाईट एडिशनमध्ये ब्लॅक पेंट स्कीमसह ही कार सादर करण्यात आली आहे. यासोबतच हेडलाइट्स आणि टेललाइट्सनाही स्मोकर ट्रीटमेंट देण्यात आली आहे. ही कार दिसायला खूप आकर्षक आहे. यासोबतच यात 18 इंची अलॉय व्हील्सही देण्यात आले आहेत.


Hyundai Creta N Line Night Edition: इंटीरियर कसे आहे?


याच्या इंटीरियरबद्दल बोलायचे तर डॅशबोर्ड लेआउटला स्पोर्टी फील देण्यासाठी लाल अॅम्बियंट लाइटिंगसह लाल रंगात दिला गेला आहे. एसयूव्हीला ब्लॅक लेदरसह स्पोर्टी एन लाइन स्टीयरिंग व्हील, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, क्रूझ कंट्रोल, 360-डिग्री कॅमेरा, बोस प्रीमियम साउंड सिस्टम, ब्लू लिंक कनेक्टेड कार टेक, लेव्हल 2 आणि ADAS सारखे आधुनिक फीचर्स यात देण्यात आले आहे. याशिवाय यात पॅनोरामिक सनरूफ, व्हेंटिलेटेड ड्रायव्हर सीट आणि ऑटोमॅटिक एअर कंट्रोल सारखे फीचर्स यात देण्यात आले आहे.


Hyundai Creta N Line Night Edition: इंजिन


क्रेटाच्या या लिमिटेड एडिशनचे फक्त 900 युनिट्स उपलब्ध असतील. ही SUV दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ज्यात ब्लॅक, सिल्क ग्रे विथ ब्लॅक रुफ आणि व्हाईट विथ ब्लॅक रुफ यांचा समावेश आहे. क्रेटा एन-लाइन डार्क एडिशन 2.0-लिटर नॅच्युरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. जे 157 bhp पॉवर आणि 202 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडले गेले आहे.


Kia Seltos शी स्पर्धा करते


कार Kia Seltos शी स्पर्धा करते. ज्याला Creta प्रमाणेच पॉवरट्रेन पर्याय मिळतो.


इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: 


Honda CB350: मस्क्युलर बॉडी, पावरफुल इंजिन; होंडाची नवीन CB 350 बाईक लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत


Car loan Information:

Calculate Car Loan EMI