मुंबई : गाडी चालवणाऱ्या प्रत्येकाला इंधनातून अधिकाधिक परतावा कसा मिळेल, याची थोडीफार काळजी असतेच. त्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न त्याच्याकडून केले जातात. गाडीच्या सर्व्हिसिंगपासून ते गाडीची योग्य निगा अशा सर्व गोष्टी केल्या जातात.  'मायलेज' वाढवण्यासाठी काही सोप्या टिप्स आपण पाहूयात..


1. गाडी नीट चालवा


ताशी 70-80 किमी हा वेग 'मायलेज'साठी उत्तम असतो. त्याहून अधिक वेगानं गेलात तर इंधन जास्त खर्च होतं हे नेहमी लक्षात ठेवा.


2. गिअर वेळेत बदला


कमी गिअरमध्ये पिक-अप जास्त मिळतो म्हणून तसं करण्याची अनेकांना सवय असते. मात्र त्यामुळे इंजिनवर विनाकारण ताण येतो, ज्यामुळे 'मायलेज' बरंच कमी होतं.


3. घाटात गिअरचं समीकरण बदलतं


घाटात चढत असताना अनेकदा ताशी 10-15 किमीच्या वेगासाठीदेखील पहिला गिअर गरजेचा असतो. दुसरा गिअर टाकला तर गाडी नीट चढत नाही, ज्यामुळे इंजिनवर ताण येतो. त्यामुळे चढावर कार चालवण्याचा नीट सराव हवाच.


4. ट्रॅफिकमध्ये न्यूट्रलवर ठेवा


वाहतूक कोंडीत गाडी सतत पहिल्या गिअरमध्ये ठेवू नका. गाडी थांबली की गिअर न्यूट्रलवर आणा. थोडे कष्ट पडतील कदाचित, पण 'मायलेज' वाढतं हे नक्की.


5. थोडक्यासाठी कार बंद करू नका


अनेकदा असं होतं की सिग्नल सुटायला 20-30 सेकंद असतात, तेव्हा कार बंद करू नका. कारण त्या वेळेत जे इंधन वाचवाल, त्यापेक्षा जास्त इंधन कार सुरू करण्यासाठी लागतं.


6. गाडीला झटके देऊ नका


अनेकांना वेग वाढवताना झटके देण्याची सवय असते. हे 'मायलेज'साठी अतिशय प्रतिकूल. गाडीचा वेग वाढवणं असो किंवा गाडी थांबवणं असो, ते हळूवारपणेच केलं पाहिजे.


7. टायर हवेचा दाब


वाहन कंपनीनं हवेचा जो दाब सांगितला आहे, तो कायम राहिला पाहिजे. त्यासाठी नियमितपणे दाब तपासत राहा. जेवढी हवा कमी, 'मायलेज' तेवढंच घटत जातं.


8. 'सर्व्हिसिंग' वेळेतच हवं


गाडी मेन्टेनन्सला गेल्यावर इंजिन ऑईल बदललं जातं. ते वेळेत बदललं नाही तर इंजिनातील भागांमधलं घर्षण वाढतं, ज्यामुळे इंजिनला इंधन अधिक लागतं, परिणामी 'मायलेज' कमी होतं.


9. खिडक्या बंद पाहिजेत


विशेष करून महामार्गांवर खिडक्या उघड्या ठेवू नका. त्यानं गाडीचं एरोडायनॅमिक्स बिघडतं, आणि गाडीला मागे खेचणाऱ्या तत्वाचं (ड्रॅग) बळ वाढतं, ज्यामुळे इंजिनला जास्त काम करावं लागतं, परिणामी 'मायलेज' कमी होतं. 


ही बातमी वाचा: 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI