VIP Number for Car and Bike : आपल्या कार किंवा दुचाकीला खास नंबर असावा अशी अनेक वाहन प्रेमींची इच्छा असते. काही जण या लकी नंबरसाठी मोठी रक्कम देखील मोजायला तयार असतात. आपल्या गाडीला फॅन्सी नंबर किंवा व्हीआयपी नंबर मिळावा म्हणून ही धडपड असते. परंतु, हा फॅन्सी नंबर मिळवण्याची प्रक्रिया फार गुंतागुंतीची असते. व्हीआयपी नंबरसाठी अर्जदाराला ई-लिलावासारक्या प्रक्रियेतून जावे लागते. पंरतू आज आपण कारसाठी फॅन्सी नंबर कसा मिळवायचा याबाबत काही गोष्टी जाणून घेणार आहोत.
व्हीआयपी नंबसाठी तुम्हाला प्रथम ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. फॅन्सी नंबर कार डीलरशिपवर ऑनलाइन उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला आरटीओ कार्यालयात जावे लागणार नाही. तर डीलरशिपवरील फॅन्सी नंबरच्या यादीतून तुम्हाला हवा असलेला निवडू शकतात. परंतु. त्यासाठी तुम्हाला प्रथम MoRTH च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. MoRTH वर साइन अप केल्यानंतर तुम्ही नंबर निवडा. त्यानंतर निवडलेला नंबर बुक करण्यासाठी आवश्यक नोंदणी शुल्क भरावे लागेल. तुनची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फॅन्सी नंबरसाठी बोली लागेल आणि त्यानंतर त्याचा निकाल जाहीर केला जाईल.
व्हीआयपी नंबरसाठीचे शुल्क आणि नोंदणी शुल्क हे प्रत्येक राज्यानुसार वेगळे असतात. फॅन्सी नंबरची किंमत वाहनाच्या प्रकारावर अवलंबून असते. अर्जदाराला त्याने नोंदणी केलेल्या वेळेपासून फॅन्सी क्रमांक वाटप करण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी लागेल. MoRTH च्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर चौथ्या दिवशी बोलीची प्रक्रिया सुरू होते. ही प्रक्रिया पाचव्या दिवसापर्यंत चालू राहते. एकदा नंबरचे वाटप पत्र तयार झाल्यानंतर अर्जदाराला संबंधित आरटीओकडे आपल्या कारची नोंदणी करण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी दिला जातो. या कालावधीत अर्जदाराने आरटीओकडे आपल्या कारची नोंदणी करणे आवश्यक आहे.
रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर (MoRTH) सार्वजनिक वापरकर्ता म्हणून नोंदणी करा.
वेबसाईटवर साइन अप केल्यानंतर तुमच्या खात्यात लॉगिन करा आणि फॅन्सी नंबर निवडा.
नंबर निवडल्यानंतर त्या क्रमांकासाठी आवश्यक असलेले शुल्क भरा आणि क्रमांक आरक्षित करा.
नंबर आरक्षित केल्यानंतर तुमच्या पसंतीच्या क्रमांकासाठी बोली लावा.
बोलीचा निकाल घोषित झाल्यानंतर तुम्ही शिल्लक रक्कम भरू शकता किंवा तुमची परताव्याची रक्कम मिळवू शकता.
महत्वाच्या बातम्या
Tata Nexon ची बंपर विक्री, आता नंबर 1 पासून फक्त दोन पावले दूर
Volkswagen Virtus 2022 : फोक्सवॅगन व्हर्चस 1.0 TSI ऑटोमॅटिकचा कसा आहे रिव्ह्यू? जाणून घ्या
Car loan Information:
Calculate Car Loan EMI