Tata Nexon ची बंपर विक्री, आता नंबर 1 पासून फक्त दोन पावले दूर

Best Selling Car In India 2022: एप्रिल महिन्यात टाटा नेक्सनची बंपर विक्री झाली आहे. या महिन्यात कंपनीने इतक्या युनिट्सची विक्री केली आहे की, ही आता देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप-3 कारपैकी एक झाली आहे. 

Continues below advertisement

Best Selling Car In India 2022: एप्रिल महिन्यात टाटा नेक्सनची बंपर विक्री झाली आहे. या महिन्यात कंपनीने इतक्या युनिट्सची विक्री केली आहे की, ही आता देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप-3 कारपैकी एक झाली आहे. 

Continues below advertisement

टाटा नेक्सॉन तिसरी सर्वाधिक विक्री होणारी कार

एप्रिलमध्ये टाटा नेक्सनच्या एकूण 13,471 युनिट्सची विक्री झाली. एप्रिल 2021 च्या तुलनेत ही वाढ 94.16% इतकी आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कंपनीने केवळ 6,938 वाहनांची विक्री केली होती. यासह टाटा नेक्सन एप्रिलमध्ये देशातील तिसरी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. 

टाटा नेक्सन ही एसयूव्ही सेगमेंटमधील नंबर 1 कार 

SUV सेगमेंटमध्ये Tata Texon नंबर एकची कार आहे (Tata Nexon No.1 SUV in April 2022). टाटाने आपल्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्धी ह्युंदाई क्रेटाला मागे टाकले आहे. क्रेटा ही एप्रिलमध्ये दुसरी सर्वाधिक विक्री होणारी SUV आणि चौथी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. याची एकूण 12,651 युनिट्सची विक्री झाली आहे.

Maruti Vitara Brezza ही भारतातील टॉप-10 SUV मधील तिसरी सर्वाधिक विक्री होणारी SUV आहे. याची 11,764 युनिट्सची विक्री झाली आहे. एकूण कारच्या यादीत ही कार 5वी सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे. तर टाटाची पंच ही देशातील चौथी सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली आहे. 10,132 युनिट्सच्या विक्रीसह ही टॉप-10 कारच्या यादीत 10 व्या क्रमांकावर आहे.

Maruti WagonR क्रमांक 1 वरच

एप्रिलच्या टॉप-10 बेस्ट सेलिंग कारच्या यादीत मारुती वॅगनआर पहिल्या क्रमांकावर आहे. याची 17,766 युनिट्सची विक्री झाली आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मारुती एर्टिगा होती, ज्याच्या 14,889 युनिट्सची विक्री झाली आहे. याशिवाय टॉप-10 कारच्या यादीत सहाव्या क्रमांकावर मारुती इको, सातव्या क्रमांकावर बलेनो, आठव्या क्रमांकावर डिझायर आणि नवव्या क्रमांकावर अल्टो आहे.

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola