AC in vehicle : अलीकडच्या काळात सर्रास चारचाकी (Car) वाहनांमध्ये आपल्याला (कार) एसी (AC) असल्याचं पाहायला मिळतं. वाहन सुरु असताना गरम होऊ नये म्हणून अनेकजण प्रवासात एसीचा वापर करतात. पण कारमधील एसी चालू केल्याने अॅव्हरेज कमी होते असं काही जणांचं म्हणणं आहे. तर कारमध्ये एक तास एसी चालू ठेवल्यास किती पेट्रोल (Petrol) खर्च होते?  याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती. 


मोठ्या इंजिन क्षमतेच्या गाड्यांमध्ये एसी वापरल्यास जास्त पेट्रोल खर्च होते


कारमध्ये एसी सुरु ठेवण्यासाठी तासाभरात किती पेट्रोल लागते हे पूर्णपणे कारचे मॉडेल, इंजिन क्षमता आणि एसीची कार्यक्षमता यावर अवलंबून असते. पण तरीही लहान व मोठ्या कारबद्दल काही अंदाज बांधता येतात. इंजिनची क्षमता (CC) हा त्यातील महत्वाचा घटक आहे. लहान कारमध्ये साधारणपणे 1.2 ते 1.5 लिटर इंजिन असतात, तर मोठ्या कारमध्ये 2.0 लिटर किंवा त्याहून जास्त मोठी इंजिन असतात. मोठ्या इंजिन क्षमतेच्या गाड्यांमध्ये एसी वापरल्यास जास्त पेट्रोल खर्च होते. लहान कारमध्ये (1.2-1.5 लिटर इंजिन) एक तास एसी वापरल्यास जवळपास 0.2 ते 0.4 लिटर पेट्रोल खर्च होऊ शकतं. मोठ्या कारमध्ये (2.0 लिटर किंवा त्यापेक्षा जास्त पेट्रोल इंजिन) एक तास एसी वापरल्यास जवळपास 0.5 ते 0.7 लिटर पेट्रोल खर्च होऊ शकतं.


गाडी थांबलेली असताना एसीचा सुरु केल्यास इंधनाचा वापर जास्त


गाडी थांबलेली असेल तर अशावेळी एसी चालू ठेवल्यास इंधनाचा वापर जास्त होईल. गाडी धावत असेल तर त्याचा वापर थोडा कमी होऊ शकतो, पण एसीमुळे गाडीचे अॅव्हरेज नक्कीच कमी होईल. एसीच्या सेटिंगचाही इंधनाच्या वापरावर फरक पडतो. जर एसी खूप कमी तापमानात सेट केला असेल, तर कॉम्प्रेसरला जास्त काम करावं लागेल, ज्यामुळं इंधनाचा वापर वाढेल. जर तुमच्या कारचे इंजिन जुने आहे किंवा कमी एफिशियंट आहे तर एसी चालवल्यावर इंधनाचा वापर जास्त होईल.


एसी तासभर वापरल्यास 0.2 ते 0.7 लिटर पेट्रोल लागते


कारचा एसी तासभर वापरल्यास 0.2 ते 0.7 लिटर पेट्रोल लागते. पेट्रोल किती खर्च होईल हे तुमच्या कारचे मॉडेल आणि वापरावरही अवलंबून असते. जर तुम्हाला कारचे अॅव्हरेज वाढवायचं असेल, तर कारमधील एसीचा वापर नीट करा. तुमची कार हवेशीर जागेत पार्क करा, एसीचे तापमान मध्यम ठेवा आणि शक्य असल्यास एसीचा वापर कमीतकमी करा.


महत्वाच्या बातम्या:


Kia Seltos X Line : किया सेल्‍टोस एक्‍स-लाइनचे 'ब्लॅक' एडिशन लॉन्च, वाचा काय आहेत वैशिष्ट्ये


Car loan Information:

Calculate Car Loan EMI