Electric Car : इलेक्ट्रिक कारकडे ग्राहकांचा कल झपाट्याने वाढला आहे. या कारला ग्राहकांची पसंती मिळू लागली आहे. आणि ग्राहकांनी ही कार खरेदी करण्याचाही विचार सुरू केला आहे. यामागचं कारण म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झालेली वाढ. इलेक्ट्रिक कार पेट्रोल-डिझेल किंवा इतर इंधनावर चालत नाहीत, त्या बॅटरीवर चालतात. मात्र, ही इलेक्ट्रिक कार नेमकी कशी कार्य करते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? जर तुम्ही विचार केला नसेल तर इलेक्ट्रिक कार चालवण्यात काही प्रमुख घटकांचा मोठा वाटा असतो. ही कार नेमकी कशी कार्य करते ते पाहा.
कोणत्याही इलेक्ट्रिक कारमध्ये काही घटक मोठी भूमिका बजावतात. यामध्ये बॅटरी, चार्ज पोर्ट, डीसी/डीसी कन्व्हर्टर, इलेक्ट्रिक ट्रॅक्शन मोटर, ऑनबोर्ड चार्जर, पॉवर इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर, थर्मल सिस्टम, ट्रॅक्शन बॅटरी पॅक आणि ट्रान्समिशन यांचा समावेश आहे.
इलेक्ट्रिक कारचे प्रकार किती आणि कोणते?
इलेक्ट्रिक कारचे तीन प्रकार आहेत. हे प्रकार नेमके कोणते ते जाणून घ्या.
1. प्लग-इन इलेक्ट्रिक : ही कार पूर्णपणे विजेवर चालते आणि जेव्हा ही कार प्लग करून चार्ज केली जाते तेव्हाच ही वीज उपलब्ध होते.
2. प्लग-इन-हायब्रीड : ही कार प्रामुख्याने विजेवर चालते. परंतु, त्यासोबत पारंपारिक इंधन इंजिन म्हणजेच पेट्रोल किंवा डिझेल इंजिनची सुविधाही देण्यात आली आहे. या प्रकारात, चार्ज संपल्यानंतर तुम्ही कार पेट्रोल किंवा डिझेल इंजिनवर चालवू शकता.
3. हायब्रिड-इलेक्ट्रिक : ही कार प्रामुख्याने पेट्रोल किंवा डिझेल इंजिनवर चालते. परंतु, त्यासोबत इलेक्ट्रिक बॅटरीची सुविधाही देण्यात आली आहे, जी रिजनरेटिव्ह ब्रेकिंगद्वारे चार्ज होते. या कारची बॅटरी प्लग इन करून चार्ज करावी लागत नाही.
इलेक्ट्रिक कार कशी काम करते.
सर्व-इलेक्ट्रिक वाहने (ज्याला बॅटरी इलेक्ट्रिक वाहने (BEVs) असेही म्हणतात) मोटरला शक्ती देणारी विद्युत ऊर्जा साठवण्यासाठी बॅटरी पॅक वापरतात. वाहनाला विद्युत उर्जा स्त्रोतामध्ये प्लग करून बॅटरी चार्ज केल्या जातात. सहाय्यक बॅटरी इलेक्ट्रिक वाहनाच्या अॅक्सेसरीजला उर्जा देते. या शक्तीने गाडीची चाके फिरतात आणि गाडी पुढे जाऊ लागते. एडफेनर्जीनुसार, इलेक्ट्रिक कार पारंपारिक इंधन इंजिन (पेट्रोल किंवा डिझेल) असलेल्या वाहनांपेक्षा वेगाने धावतात. त्यामुळे इलेक्ट्रिक कार चालवायला हलक्या वाटतात.
महत्वाच्या बातम्या :
Car loan Information:
Calculate Car Loan EMI