Maruti Baleno CNG vs Toyota Glamza CNG : जर तुम्ही सीएनजी कार घेण्याचा विचार करत असाल. मात्र, कार निवडण्यात तुमचा गोंधळ होत असेल तर या ठिकाणी दोन कारविषयी सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या ठिकाणी मारूती बलेनो आणि Toyota Glamza अशा दोन कारची तुलना करण्यात आली आहे. याच्या मदतीने तुम्ही कार खरेदी करताना कोणती आवश्यकता असते हे निवडणे सोपे होईल. 


दोन्ही कारचे डिझाइन कसे आहे? 


टोयोटाच्या नवीन ग्लान्झा सीएनजी कारमध्ये क्रोम आऊटलाइन, ब्लॅक-आउट ग्रिल, रुंद एअर डॅम, पॉवर अँटेना आणि रूफ-माउंटेड स्पॉयलरसह मस्क्यूलर बोनेट देखील आहे. त्याचबरोबर या कारमध्ये तुम्हाला अपडेटेड फॉग लॅम्प देखील देण्यात आले आहेत. जर, Baleno CNG बद्दल बोलायचे झाल्यास, या कारचा संपूर्ण लूक बदलण्यात आला आहे. त्यामुळे ही कार तुलनेने मोठी दिसते. 


दोन्ही कारचे इंजिन कसे आहे? 


Toyota Glanza मध्ये BS6 1.2-L पेट्रोल इंजिन सोबत, कंपनीने CNG किटचा समावेश केला आहे. कंपनीच्या मते, या सीएनजी कारचे मायलेज 30.61 किमी प्रति किलोपर्यंत मिळू शकते. दुसरीकडे, जर मारुती सुझुकी बलेनो S-CNG बद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये तुम्हाला 1.2-L Dualjet पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. तसेच, या कारमध्ये स्टार्ट/स्टॉप टेक्नॉलॉजीदेखील आहे. बलेनोचे इंजिन 76.4 एचपी कमाल पॉवर आणि 98.5 एनएम पीक-टॉर्क निर्माण करते.


दोन्ही कारचे इंटर्नल फिचर्स कसे आहेत? 


Glanza आणि Baleno दोन्ही कार तुम्हाला अतिशय आरामदायी अनुभव देतील. या कारमध्ये 5-सीटर केबिन तसेच नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कनेक्टेड कार टेक असलेली 9-इंच टचस्क्रीन प्रणाली, Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट देतात. याशिवाय, तुम्हाला दोन्ही कारमध्ये वायरलेस फोन चार्जर, 360-डिग्री कॅमेरा आणि हेड-अप डिस्प्ले सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून, दोन्ही वाहनांना पार्किंग कॅमेरे आणि सेन्सर्ससह अनेक एअरबॅग्ज मिळतात.


किंमत किती? 


दोन्ही कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, भारतातील टोयोटा ग्लान्झा CNG ची किंमत टॉप मॉडेलसाठी 8.43 लाख ते 9.46 लाख (एक्स-शोरूम) आणि मारुती सुझुकी बलेनो S-CNG ची किंमत रु. 8.28 लाख ते 9.21 लाख (एक्स-शोरूम) तोपर्यंत आहे. किमतीच्या बाबतीत, टोयोटा ग्लान्झा बलेनोपेक्षा सुमारे 25,000 स्वस्त आहे. परंतु लूक, फिचर्सच्या बाबतीत टोयोटा ग्लान्झा बलेनोपेक्षा किंचित वर आहे.


महत्वाच्या बातम्या : 


Tata CNG Car : टाटा मोटर्सकडून Tiago NRG iCNG चा टीझर रिलीज; मारुतीच्या Wagon R CNG बरोबर करणार स्पर्धा


Car loan Information:

Calculate Car Loan EMI