Hop Oxo Electric Bike Launched: तेलंगणा राज्य सरकारद्वारे आयोजित हैदराबाद ई-मोटर शोमध्ये हॉप इलेक्ट्रिकने आपली हॉप ऑक्सो इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.60 लाख ते 1.80 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. हैदराबादमधील हिमायत नगर, उप्पल, करमनघाट, मलाकपेट, कोमपल्ली, कुकटपल्ली आणि मेडचल या 10 केंद्रावर ही बाईक विक्रीसाठी उपलब्ध आहे.


या बाईकच्या लॉन्चिंगवेळी होप इलेक्ट्रिकचे सह-संस्थापक निखिल भाटिया म्हणाले की, “आम्ही तेलंगणा सरकारला एका अद्भुत ई-मोबिलिटी सप्ताहासाठी अभिनंदन करू इच्छितो. मार्केटमध्ये गेम चेंजर ठरणाऱ्या Oxo ने हैदराबादच्या पहिल्या ई-रॅलीमध्ये भाग घेतला. "


Hop Oxo Electric Bike Launched: ही बाईक 5 रंग पर्यायांमध्ये आहे उपलब्ध


हॉप ऑक्सो इलेक्ट्रिक बाईक ट्वायलाइट ग्रे, कँडी रेड, मॅग्नेटिक ब्लू, इलेक्ट्रिक यलो आणि ट्रू ब्लॅक अशा 5 रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या बाईकची सर्व प्रो पॅकेज फीचर्स कंपनीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन आहेत.


Hop Oxo Electric Bike Launched: किती आहे रेंज?


Hop Oxo इलेक्ट्रिक बाईकमध्ये 3.75 kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी वापरण्यात आली आहे. जी BLDC हब मोटरला जोडलेली आहे. ही मोटर 5.2 kW/6.2 kW ची कमाल पॉवर आणि 185 Nm/200 Nm कमाल टॉर्क जनरेट करू शकते. या बाईकचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे. अंदाजे 135 किमी ते 150 किमीचा दावा केला आहे. 850W चा चार्जर वापरून ही बाईक 4 तासात 0 ते 80 टक्के चार्ज करता येते. यात इको, पॉवर, स्पोर्ट आणि रिव्हर्स 4 राइडिंग मोडसह FOC वेक्टर कंट्रोल देखील आहे.


Hop Oxo Electric Bike Launched: सस्पेन्शन आणि ब्रेकिंग


बाईकच्या पुढच्या बाजूला सरळ टेलिस्कोपिक फोर्क आणि मागच्या बाजूला हायड्रॉलिक स्प्रिंग लोडेड सस्पेन्शन आहे. 250 किलोग्रॅम लोड क्षमतेसह याला कॉम्बी-ब्रेक सिस्टम आणि रीजनरेटिव्ह ब्रेकिंगसह डिस्क ब्रेक मिळतात.


Hop Oxo Electric Bike Launched: फीचर्स 


Hop Oxo इलेक्ट्रिक बाईकमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5-इंचाचा स्मार्ट LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 4G LTE कनेक्टिव्हिटी आणि GNSS सह AGPS ने सुसज्ज आहे. मोबाइल अॅप कनेक्टिव्हिटीसाठी, ते ब्लूटूथ 5.0 आणि 128-बिट एन्क्रिप्शनसह एज टू क्लाउड सेफ्टीसाठी देण्यात आले आहे.


कबीरा KM 4000 शी स्पर्धा करेल


ही बाईक कबीरा मोबिलिटीच्या KM 4000 बाईकशी स्पर्धा करेल. ही बाईक 8kW BLDC मोटरने सुसज्ज आहे. याचा टॉप स्पीड 120 किमी प्रतितास आहे. यात 4.3 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आला हे, ज्यामुळे बाईकला प्रति चार्ज 150 किमीची रेंज मिळते.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI