New MPVs in India : भारतात गेल्या काही वर्षांत 7 सीटर एमपीव्ही (MPV) कारची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय. ज्यामुळे अनेक कंपन्यांनी त्यांचे नवीन मॉडेल्सही लॉन्च केले आहेत. यावर्षी सुद्धा आपल्याला अनेक नवीन SUV आणि MPV कार देशात पाहायला मिळतील. आज आम्ही तुम्हाला अशाच 4 नवीन परवडणाऱ्या 7 सीटर कारविषयी तुम्हाला सांगणार आहोत. ज्या याच वर्षी लॉन्च होणार आहेत. 


Citroen C3 एअरक्रॉस (Citroen C3 Aircross) :


Citroen भारतात नवीन थ्री-रो SUV ची चाचणी करत आहे. ही कार C3 हॅचबॅकवर आधारित असेल. ही कार 5 आणि 7-सीट कॉन्फिगरेशनसह लॉन्च केली जाऊ शकते. हे भारतीय बाजारात कंपनीच्या C-cubed योजनेअंतर्गत 1.2L, 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन मिळू शकते. हे इंजिन 110bhp पॉवर आणि 190Nm टॉर्क जनरेट करू शकते.


निसान 7-सीटर MPV (Nissan 7-Seater MPV) :


Nissan ने अलीकडेच भारतीय बाजारपेठेसाठी एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक कारसह नवीन 7-सीटर MPV लाँच केल्याची पुष्टी केली आहे. नवीन 7 सीटर एमपीव्ही रेनॉल्ट ट्रायबरवर आधारित असेल. ट्रायबरसारखीच पॉवरट्रेन या कारमध्ये दिसू शकते. मात्र, त्याचा लूक ट्रायबरपेक्षा वेगळा असेल. या कारची रचना निसानच्या सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही मॅग्नाइट सारखी असू शकते. 


टोयोटा रूमियन (Toyota Rumion) :


जपानी ऑटोमेकर कंपनी टोयोटा लवकरच आपली नवीन एमपीव्ही रुमियन देशात आणणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या बाजारात ही कार आधीच विकली गेली आहे. ही कार मारुती सुझुकीच्या Ertiga MPV वर आधारित आहे. त्याचे जागतिक मॉडेल 1.5L नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल SHVS इंजिनवर आधारित आहे, जे 103bhp आणि 138 Nm ची ऊर्जा जनरेट करते. ही कार भारतात या वर्षाच्या उत्तरार्धात म्हणजेच सहा महिन्यांनी लॉन्च केली जाऊ शकते. 


महिंद्रा बोलेरो निओ प्लस (Mahindra Bolero Neo Plus) :


महिंद्राची बोलेरो निओ प्लस देखील यावर्षी भारतात लॉन्च होऊ शकते. सध्या कंपनीने याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही. या कारमध्ये 2.2L mHawk डिझेल इंजिन दिसू शकते. तसेच, कारमध्ये 7-सीट आणि 9-सीट लेआउट दिसू शकतात. कंपनी या कारची अॅम्ब्युलन्स व्हर्जन देखील लॉन्च करू शकते, ज्यामध्ये रुग्णाच्या बेडसह 4 सीटर लेआउट मिळेल.


महत्त्वाच्या बातम्या : 


Bugatti Chiron Sport Car: बुगाटीने आपल्या शेवटच्या पेट्रोल कारचा केला लिलाव, तब्बल इतक्या कोटींना कार विकून केला विश्वविक्रम


Car loan Information:

Calculate Car Loan EMI