Hero Upcoming Electric Scooter: इलेक्ट्रिक टू-व्हीलरची वाढती मागणी लक्षात घेऊन Hero लवकरच आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत  आणणार आहे. ज्याची माहिती कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक टीझर जारी करून दिली आहे. ही अपकमिंग स्कूटर ओला, टीव्हीएस, अथर यांसारख्या कंपन्यांच्या स्कूटर्सशी स्पर्धा करेल. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कोणकोणते खास फिचर्स पाहायला मिळणार, याची रेंज किती असू शकते, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ...


Hero Upcoming Electric Scooter: नवीन इलेक्ट्रिक स्कूटर उद्या होऊ शकते लॉन्च 


इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंट Hero आणखी एक स्कूटर लॉन्च करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Hero ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर उद्या म्हणजेच 15 मार्च रोजी लॉन्च करू शकते. या स्कूटरचा टीझर कंपनीने सोशल मीडियावर रिलीज केला आहे, ज्यामध्ये या इलेक्ट्रिक स्कूटरची छोटीशी झलक पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ फक्त 12 सेकंदांचा आहे.


Hero Upcoming Electric Scooter: मिळू शकतात हे फीचर्स 



कंपनीने जारी केलेल्या टीझरमध्ये 'कमिंग सून', असे लिहिले आहे. याच ट्विटमध्ये कंपनीच्या वतीने असे लिहिले आहे की, "सस्टेबल मोबेलिटीचे नवे पर्व सुरू होणार आहे, ज्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. तुम्ही या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरवर प्रवास करण्यास तयार आहात का? हिरो?" यावरून अंदाज लावला जात आहे की यात अनेक खास फीचर्स ग्राहकांना पाहायला मिळतील.


मिळालेल्या माहितीनुसार, हिरो आपले आधीच विक्री करत असलेले हिरो ऑप्टिमा मॉडेल अपडेट करून सादर करू शकते. मात्र कंपनीकडून अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दुसरीकडे टीझरमध्ये दिसणार्‍या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये समोरच्या काऊलवर एलईडी हेडलॅम्प आणि समोरील डिस्क ब्रेक, आरामदायी सीट, जाड ग्रॅब रेल आणि ब्लू पेंट थीमसह मध्यभागी एलईडी टर्न इंडिकेटर दिसू शकतात.


Hero Upcoming Electric Scooter: किंमत असेल कमी?


बाजारात बजेट इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी जास्त आहे, ती लक्षात घेऊन याची किंमत कंपनी कमी ठेवू शकते. जेणेकरून हिरो या इलेक्ट्रिक स्कूटरच्या माध्यमातून बाजारात आधीपासूनच असलेल्या ओला, टीव्हीएस, एथर सारख्या कंपन्यांच्या स्कूटरला टक्कर देऊ शकेल.


Hero Upcoming Electric Scooter: इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये उपलब्ध असलेले स्कूटर 


हिरो हा इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमधील खूप जुना ब्रँड आहे. याच्या पोर्टफोलिओमध्ये आधीपासूनच लो-स्पीड, हाय-स्पीडसह विविध मॉडेल्स आहेत.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI