MG Comet Launch: MG Motors एप्रिल 2023 मध्ये भारतात आपली बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार Comet EV लॉन्च करणार आहे. कंपनीने अलीकडेच आपल्या 2- डोअर इलेक्ट्रिक कारचा अधिकृत फोटो जाहीर केला आहे. या इलेक्ट्रिक कारची लांबी केवळ 2.9 मीटर आहे, जी टाटा नॅनोपेक्षाही लहान आहे. नवीन मॉडेलची भारतात एक्स-शोरूम किंमत सुमारे 10 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. ही कार भारतीय बाजारपेठेत Tata Tiago EV आणि Citroën E C3 शी स्पर्धा करेल.


MG Comet Launch: लूक


एमजी कॉमेट इलेक्ट्रिक कार कंपनीने त्याच्या नवीन ग्लोबल स्मॉल इलेक्ट्रिक व्हेइकल्स (GSEV) प्लॅटफॉर्मवर डिझाइन केली आहे. ही एक कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार आहे. ज्याची लांबी कमी आणि बॉक्सी आहे. ही EV इंडोनेशियामध्ये विकल्या जाणाऱ्या Wuling Air EV सारखीच आहे. याचे चार्जिंग पोर्ट MG च्या ब्रँडिंग लोगोच्या अगदी समोर दिलेले आहे, जसे की कंपनीच्या ZS EV मध्ये देखील दिसते. कारच्या पुढील बाजूस ड्युअल, वर्टिकल स्टॅक केलेले हेडलॅम्प, इंटिग्रेटेड टर्न इंडिकेटरसह एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प आणि ड्युअल-टोन फ्रंट बंपर मिळतात. विंडस्क्रीनच्या खाली एक क्रोम पट्टी आणि एलईडी लाइट बार आहे. कंपनीने कॉमेटचे अनेक फोटो जारी केले आहेत, ज्यामध्ये ड्युअल-टोन कलर थीम देखील दिसली आहे.


MG Comet Launch: बाह्य डिझाइन


एमजी कॉमेट ईव्हीच्या केबिनमध्ये मोठी रिअर क्वार्टर ग्लास देण्यात आली आहे. त्यामुळे व्हेंटिलेशनची समस्या येणार नाही. या छोट्या कारला व्हील कव्हर्ससह 12 इंच लहान स्टील चाके मिळतील. मागील बाजूस उभ्या स्टॅक केलेले टेल-लॅम्प, एक उच्च-माऊंट स्टॉप लॅम्प आणि लायसन्स प्लेट हाउसिंगसह एक सपाट मागील बंपर असेल.


MG Comet Launch: कसे असेल इंटीरियर?


आकाराने लहान असूनही या कारमध्ये अनेक फीचर्स पाहायला मिळतील. तसेच याची केबिन खूपच आरामदायक असेल. यामध्ये Air EV सारखे फीचर्स आणि इंटेरियर लेआऊट पाहायला मिळेल. याचा डॅशबोर्ड ड्युअल-टोन शेडमध्ये असेल. यात स्लीक एअर-कॉन व्हेंट्स, ऑटोमॅटिक एअर कंडिशनिंग, कनेक्टेड कार टेक, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, मल्टी-फंक्शनल टू-स्पोक स्टीयरिंग व्हील, कीलेस एंट्री, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिट, ड्युअल 10.25-इंच डिस्प्ले, एसी कंट्रोल्ससाठी रोटरी, नॉब्स आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल सारखे फीचर्स यात देण्यात आले आहेत.


MG Comet Launch: पॉवरट्रेन 


MG Comet EV ला Wuling Air EV प्रमाणेच बॅटरी पॅक पर्याय मिळतील. एंट्री-लेव्हल व्हेरियंटमध्ये 17.3kWh बॅटरी पॅक आणि हाय-एंड प्रकारात 26.7kWh बॅटरी पॅक मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यांना अनुक्रमे 200kms आणि 300kms ची अंदाजे रेंज मिळण्याची अपेक्षा आहे.


या कारशी होणार स्पर्धा 


ही कार बाजारात Tata Tiago EV आणि Citroën E C3 शी स्पर्धा करेल.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI