Hero Splendor Bike: प्रसिद्ध बाईक उत्पादक कंपनी Hero MotoCorp च्या ‘Hero Splendor’ या बाईकचा दबदबा पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत दिसून आला आहे. ‘हिरो’ कंपनीची ही बाईक गेल्या महिन्यातच सर्वाधिक विकली जाणारी बाईक ठरली आहे. कंपनीने अवघ्या महिनाभरात या बाईकचे 2 लाखांहून अधिक युनिट्स विकले आहेत. हिरो स्प्लेंडर या बाईकने ‘रॉयल एनफील्ड क्लासिक 350’, ‘बजाज पल्सर’, ‘होंडा सीबी शाईन’ आणि ‘टीव्हीएस अपाचे’ यांसारख्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाईक्सनाही या बाईकने मागे टाकले आहे. हिरो स्प्लेंडरने गेल्या 5 महिन्यांपासून भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विक्री होणाऱ्या मोटारसायकलचा किताब कायम राखला आहे.


‘Hero Splendor’ या बाईकने केवळ सर्वाधिक विकली जाणारी बाईकच नाही, तर गेल्या महिन्यात सर्वाधिक विकल्या जाणार्‍या दुचाकीचा किताबही पटकावला आहे. गेल्या महिन्यात सुमारे 2,62,249 ग्राहकांनी ही बाईक खरेदी केली आहे.


सर्वाधिक विकली जाणारी बाईक!


भारतीय बाजारपेठेत हिरो स्प्लेंडरची मागणी इतकी दिसून आली आहे की, त्याची विक्री Hero HF Deluxe पेक्षाही (कंपनीची दुसरी सर्वाधिक विक्री होणारी बाईक) दुप्पट झाली आहे. गेल्या महिन्यात Hero HF Deluxe ही बाईक एकूण 1,27,330 ग्राहकांनी खरेदी केली होती. Hero च्या या HF Deluxe बाईकची सुरुवातीची किंमत 56,070 पासून  (दिल्ली एक्स-शोरूम) ते 64,520 रुपयांपर्यंत आहे.


‘या’ बाईक्समध्येही चुरस!


HeroHF Deluxe गेल्या महिन्यात 1,27,330 ग्राहकांनी खरेदी केली होती. त्याच वेळी, 1,19,765 ग्राहकांनी Honda CB Shine खरेदी केली. याचा अर्थ, स्प्लेंडर आणि एचएफ डिलक्सच्या खरेदीमध्ये दुप्पट फरक दिसू शकतो. परंतु, एचएफ डिलक्स आणि होंडा सीबी शाईनच्या विक्रीतही प्रचंड स्पर्धा आहे.


Hero Splendor ची किंमत काय?


भारतीय बाजारात ‘हिरो स्प्लेंडर’ची किंमत 69,380 रुपयेपासून (दिल्ली एक्स-शोरूम) सुरु होते, ते 70,700 रुपयांपर्यंत ही बाईक खरेदी करता येते. Hero HF 100 आणि Hero HF Deluxe हिरोच्या या दोन गाड्या परवडणाऱ्या बाईक्सच्या यादीत समाविष्ट आहेत. Hero HF 100ची किंमत 51,450 रुपये (दिल्ली एक्स-शोरूम) आहे.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI