Bharat New Car Assessment Program: केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी भारत-एनसीएपी (Bharat-NCAP) किंवा इंडियाज न्यू कार असेसमेंट प्रोग्राम लॉन्च करण्याच्या मसुद्याला मान्यता दिली आहे. या अंतर्गत कारला त्यांच्या क्रॅश टेस्टच्या   कामगिरीच्या आधारे स्टार रेटिंग दिले जाईल.


गडकरींनी ट्वीट करून दिली ही माहिती 


नितीन गडकरी एका मागून एक ट्वीट करत म्हणाले की, Bharat-NCAP हे ग्राहक केंद्रित व्यासपीठ असेल. जे ग्राहकांना स्टार रेटिंगवर आधारित सुरक्षित कार निवडण्यास सक्षम करेल. तसेच सुरक्षित वाहने तयार करण्यासाठी भारतातील ऑटोमेकर्समध्ये स्पर्धेला प्रोत्साहन देईल आणि विविध पॅरामीटर्सवर आधारित नवीन कार मॉडेल्समध्ये समाविष्ट करण्याचा पर्याय प्रदान करेल. गडकरी म्हणाले की, क्रॅश टेस्ट कार्यक्रमाद्वारे भारतीय गाड्यांना दिलेले स्टार रेटिंग केवळ कारमधील संरचनात्मक आणि प्रवासी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठीच नव्हे तर भारतीय वाहनांच्या निर्यात-योग्यतेसाठी देखील अत्यंत महत्त्वाचे असेल.


गडकरी पुढे म्हणाले की, Bharat-NCAP कार्यक्रमाचे टेस्ट प्रोटोकॉल जागतिक क्रॅश टेस्ट प्रोटोकॉलशी जोडले जाईल आणि वाहन निर्मात्यांना भारतातील त्यांच्या इन-होऊस सुविधांवर वाहनांची टेस्ट करण्याची परवानगी देईल. गडकरी म्हणाले, भारतीय वाहन उद्योगाला स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या संदर्भात त्यांनी केलेल्या शेवटच्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, भारताला जगातील नंबर एक ऑटोमोबाईल हब बनवण्याच्या मिशनसह आपल्या ऑटोमोबाईल उद्योगाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी Bharat NCAP हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.


दरम्यान, नितीन गडकरी यांनी या वर्षी मार्चमध्ये संसदेत भारत-एनसीएपी कार्यक्रमाची माहिती दिली होती. त्यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय इंडिया न्यू कार असेसमेंट प्रोग्राम अंतर्गत कारची स्टार रेटिंग टेस्ट आणि मूल्यांकन करण्यासाठी एक योजना तयार करत आहे. त्यासाठीच्या प्रस्तावावर सरकार काम करत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


सुरक्षिततेच्या बाबतीत Kia Carens ची निराशाजनक कामगिरी, क्रॅश टेस्टिंगमध्ये मिळाली 3-स्टार रेटिंग
Car Crash Test : कशी केली जाते कार 'क्रॅश टेस्ट'? सेफ्टी रेटिंग म्हणजे काय? वाचा सविस्तर माहिती


Car loan Information:

Calculate Car Loan EMI