EV Battery Swapping Stations In India: इलेक्ट्रिक वाहनांना (EV) प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार एक मोठे पाऊल उचलणार आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी स्वॅपिंग आणि चार्जिंग स्टेशन विकसित करण्यासाठी विस्तृत योजना तयार केली जात आहे. यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) सुमारे 700 साइट्सची पाहणी करण्यात आली आहे. ही सर्व ठिकाणे पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण कॉरिडॉर आणि ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे वर आहेत. या सर्व ठिकाणी चार्जिंग पॉइंट्स आणि बॅटरी स्वॅपिंगसारख्या सुविधांसह वे-साइड सेंटर विकसित केले जातील.


रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय चार्जिंग केंद्रांच्या बांधकामाच्या करारामध्ये बॅटरी स्वॅपिंग स्टेशन समाविष्ट करण्याची योजना आखत आहे. मंत्रालयाचे सचिव गिरीधर अरमाने म्हणाले, "सरकारने राष्ट्रीय स्तरावर चार्जिंग पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी तयारी केली आहे. ईव्ही पायाभूत सुविधांच्या स्थापनेसाठी नवीन आणि सध्या असलेल्या महामार्गांवरील 700 जागांची पाहणी करण्यात आली आहे. जिथे पायाभूत सुविधांमध्ये चार्जिंग पॉइंट आणि बॅटरी स्वॅपिंग सुविधांचा समावेश आहे.


धोरणाचा मसुदा NITI आयोगाने केला जारी 


बॅटरी स्वॅपिंग धोरणाला सरकारकडून लवकरच मान्यता मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे. जेणेकरून ईव्ही वाहन वापरकर्त्यांना त्यांच्या वाहनांची डिस्चार्ज झालेली बॅटरी रिचार्ज करण्यासाठी तासनतास वाट पाहण्याच्या त्रासापासून मुक्तता मिळेल. स्वॅपिंग स्टेशनवर ड्रायव्हर त्यांच्या वाहनाची डिस्चार्ज झालेली बॅटरी चार्ज केलेल्या बॅटरी युनिटसह बदलू शकतील. ज्यामुळे चार्जिंगमध्ये वेळ वाचेल. ही समस्या लक्षात घेऊन, नीती आयोगाने बॅटरी स्वॅपिंगसाठी धोरणाचा मसुदा जारी केला आहे. जो सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.


महत्वाच्या बातम्या : 



 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI