Tvs Ronin Launch In India: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी टीव्हीएसने भारतात आपली नवीन बाईक TVS Ronin लॉन्च केली आहे. ही आपल्या प्रकारची एक वेगळी बाईक असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. ही बाईक आकर्षक डिझाइन आणि अनेक आधुनिक फीचर्ससह कंपनीने लॉन्च केली आहे. यामध्ये पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. कंपनीने याची प्रारंभिक किंमत 1.49 लाख रुपये ठेवली आहे. जी 1.71 लाख रुपयांपर्यंत जाते.


TVS Ronin मध्ये ऑल LED लाईट, LED इंडिकेटर देण्यात आले आहे. तसेच यात हायब्रीड तंत्रज्ञानाचा वापर मागील ब्रेक लाइटसाठी केला जाईल. बाईकला वर्तुळाकार हेडलाइट, रियर व्ह्यू मिरर, फ्युएल टँक आणि रुंद मडगार्डसह क्लासिक लूक देण्यात आला आहे. याची सीट स्लिम ठेवण्यात आली आहे.


याचा हँडलबार रुंद ठेवण्यात आला आहे आणि फूटपेग मध्यभागी ठेवल्या आहेत. ही बाईक ऑफ-रोडिंगसाठी बेस्ट आहे. याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, रोनिनमध्ये एक डिजिटल स्पीडोमीटर आहे. जो 28 कनेक्ट केलेल्या फीचर्ससह येतो. ज्यामध्ये स्मार्टकनेक्ट, कॉल पिकिंग, व्हॉइस, राइड मोड निवडक नेव्हिगेशन फीचर्स मिळतात.


TVS Ronin 225 मध्ये 225.9 cc चे इंजिन देण्यात आले आहे. जे 15.01 kW पॉवर आणि 19.93 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. कंपनीचे म्हणणे आहे की, याचे इंजिन मजबूत लो-रेंज आणि मिड-रेंज देणार आहे. या इंजिनसोबत 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. यात टूर मोड देखील आहे. ब्रेकिंगसाठी यात फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक्स मिळतात. तसेच यात एबीएसची सुविधाही देण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Best Mileage Scooter: मुंबई-ठाणे-मुंबई; 1 लिटर पेट्रोलमध्ये 65 kmpl पर्यंत मायलेज देतात 'हे' स्कूटर्स
Citroen C3 एसयूव्ही 20 जुलै रोजी भारतात होणार लॉन्च, किंमत असेल 6 लाखांपेक्षा कमी?
Toyota ची नवीन अर्बन क्रूझर हायराइडर 25,000 रुपयांना बुक करू शकता, जाणून घ्या सविस्तर


Car loan Information:

Calculate Car Loan EMI