Citroen C3 price in India: वाहन उत्पादक कंपनी Citroen भारतात आपली दुसरी एसयूव्ही लॉन्च करण्यास सज्ज झाली आहे. कंपनी आपली नवीन Citroen C3 20 जुलै रोजी भारतात लॉन्च करणार आहे. कंपनी अद्याप याच्या किंमतीचा खुलासा केलेला नाही. मात्र कंपनीने भारतात याची बुकिंग सुरु केली आहे. ग्राहक 21 हजार रुपयांच्या टोकन रकमेसह ही एसयूव्ही बुक करू शकतात. कंपनीने आपली Citroen C3 भारतात Live आणि Feel या दोन प्रकारात लॉन्च करणार.


भारतात या कारची स्पर्धा Tata Punch आणि Nissan Magnite शी होणार आहे. म्हणूनच याची किंमतही याच कारच्या जवळपास असण्याची शक्यता आहे. आमच्या अंदाजानुसार, कंपनी भारतात या कारची किंमत 6 लाखांपेक्षा कमी ठेवू शकते. तसेच याच्या मॅन्युअल टर्बो-पेट्रोल टॉप-व्हेरिएंटची किंमत कंपनी सुमारे 8-8.5 लाख रुपये ठेवू शकते. ही SUV कंपनी 1.2 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.2 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल अशा 3 इंजिन पर्यायांमध्ये लॉन्च केली जाईल. जी 19.8kmpl मायलेज देऊ शकते.


Citroen C3 भारतीय बाजारपेठेत 4 सिंगल कलर आणि 6 ड्युअल टोन कलर पर्यायांमध्ये सादर केली जाईल. SUV 56 कस्टमायझेशन पर्याय आणि 70 पेक्षा जास्त अॅक्सेसरीज पॅकेजेससह देखील ऑफर केली जाईल. यात एलईडी डीआरएल, हेडलॅम्प, टेल लॅम्प, ड्युअल टोन सी-पिलरसह अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. Citroen C3 ही एसयूव्ही आपल्या सेगमेंटमधील उर्वरित कारपेक्षा खूपच वेगळी आहे. यात वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि Apple कार प्ले सपोर्टसह 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 4-स्पीकर ऑडिओ सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, रिमोट कीलेस एंट्री, स्पीड सेन्सिटिव्ह ऑटो डोअर लॉक, फ्रंट यूएसबी चार्जर, मॅन्युअल अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, मागील पॉवर विंडोसारखे फीचर्सही ग्राहकांना मिळणार आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Toyota ची नवीन अर्बन क्रूझर हायराइडर 25,000 रुपयांना बुक करू शकता, जाणून घ्या सविस्तर
Maruti Suzuki भारतात लॉन्च करणार नवीन एसयूव्ही, मिळणार दमदार इंजिन
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! Royal Enfield भारतात लॉन्च करणार 6 नवीन बाईक



 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI