Best Mileage Scooter In India 2022: भारतात सध्या दुचाकींचे बरेच पर्याय उपलब्ध आहे. मात्र अनेक लोक दुचाकींमध्ये स्कूटरला अधिक पसंती देतात. यामध्येही बरेच लोक कमी किंमत आणि अधिक मायलेज देणारी स्कूटर जास्त पसंत करतात. अशातच आम्ही तुम्हाला देशात उपलब्ध असलेल्या 100 सीसी इंजिन असणाऱ्या टॉप स्कूटरबद्दल सांगणार आहोत. ज्याची किंमत कमी आणि फीचर्स दमदार आहेत. चला तर जाणून घेऊ कोणत्या आहेत या स्कूटर
TVS Scooty Pep Plus
TVS Scooty Pep Plus ही 100 cc सेगमेंटमधील सर्वात कमी किमतीची स्कूटर आहे. जी सर्वाधिक मायलेज देण्याचा दावा करते. TVS Pep Plus स्कूटरमध्ये 87.8 cc सिंगल सिलेंडर इंजिन आहे. जे 5.4 PS पॉवर आणि 6.5 Nm पीक टॉर्क जनरेट करते. स्कूटरच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा केला आहे की, ही स्कूटर 65 kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित आहे. TVS Scooty Pep Plus ची प्रारंभिक किंमत 58,734 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. जी टॉप व्हेरियंटमध्ये 61,634 रुपयांपर्यंत जाते.
TVS Jupiter
TVS Jupiter ही या यादीतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मायलेज देणारी स्कूटर आहे. जी कंपनीने सहा प्रकारांसह बाजारात लॉन्च केली आहे. TVS Jupiter मध्ये कंपनीने 109.7 cc सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. जे 7.88 PS ची पॉवर आणि 8.8 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. स्कूटरच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर 64 kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. TVS Jupiter ची प्रारंभिक किंमत 66,998 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. जी याच्या टॉप व्हेरिएंटवर 80,973 रुपयांपर्यंत जाते.
Hero Pleasure Plus
Hero Pleasure Plus ही आकर्षक डिझाइन केलेली स्कूटर आहे. जी लॉन्ग मायलेजसाठी पसंत केली जाते. Hero Pleasure Plus मध्ये कंपनीने 110.9 cc सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. जे 8.1 PS ची पॉवर आणि 8.7 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर 63 kmpl चा मायलेज देते, असा दावा कंपनीने केला आहे. Hero Pleasure Plus ची प्रारंभिक किंमत 62,220 रुपये आहे (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI