Mother's Day 2023: मातृदिन (Mothers Day) हा आईप्रती आपले प्रेम व कौतुक व्यक्त करण्याचा खास दिवस आहे. आईला आनंदित करण्यासाठी अनेक भेटवस्तूंचे पर्याय उपलब्ध असतात. पण आईसाठी काय भेटवस्तू (Gift) घ्यायची हा कायमच प्रश्न असतो. त्यामुळे असे काही पर्याय आहेत जे तुम्ही तुमच्या आईला भेट म्हणून देऊ शकता. बाहेर फेरफटका मारायला आवडणाऱ्या किंवा प्रवासाठी सोईस्कर साधनाची गरज असलेल्या आईंसाठी इलेक्ट्रिक स्कूटर सर्वोत्तम भेटवस्तू देण्यासाठीचा पर्याय ठरु शकते. इलेक्ट्रिक स्कूटर्स (Electric Scooter) पर्यावरणास अनकूल, परवडणारी व वापरण्यास अत्यंत सोपी आहे. त्यामुळे सर्व वयोगटातील आईंसाठी हे योग्य गिफ्ट आहे.
कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटर्स तुम्ही भेट म्हणून देऊ शकता?
1. बाऊंस इन्फिनिटी ई 1
बाऊंस इन्फिनिटी ई 1 मध्ये 2.9 बीएचपीचे सर्वोच्च पॉवर आऊटपुट व 83 एनएमचे सर्वोच्च टॉर्क देत ही इलेक्ट्रिक स्कूटर दोन राइड मोड्स देते . ही स्कूटर चार ते पाच तासांमध्ये संपूर्ण चार्ज होते. परवडणारी किंमत असलेल्या इन्फिनिटी ई1 मध्ये ब्ल्यूटूथ कनेक्टीव्हीटी, जिओफेन्सिंग, अॅण्टी-थेफ्ट व टोल अलर्ट्स आणि पंक्चर झाल्यास स्कूटर पुढे नेण्यासाठी ड्रॅग मोड अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. या स्कूटरची किंमत 59, 999 रूपये आहे.
2. हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा सीएक्स
ऑप्टिमा सीएक्समध्ये या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 52.2 व्होल्ट, 30 एएच लिथियम फॉस्फेट बॅटरी आहे. जी 4 ते 5 तासांमध्ये सूपंर्ण चार्ज होते. कंपनीने सिंगल व डबल बॅटरी व्हेरिएण्ट्समध्ये ही स्कूटर आहे. ज्यांची किंमत 62,190 रूपये व 77,490 रूपये आहे.
3. अॅम्पियर मॅग्नस ईएक्स
यूएसबी पोर्ट, एलसीडी स्क्रिन, कीलेस एण्ट्री व अॅण्टी-थेफ्ट अलार्म असलेली अॅम्पियर मॅग्नस ईएम्स वैशिष्ट्य संपन्न इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये 60 व्होल्ट, 30 एएच बॅटरी आहे, जी 6 ते 7 तासांमध्ये 0 ते 100 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. याची किंमत 73,999 रूपये आहे.
4. ओडीसी रेसर लाइट व्ही 2
इलेक्ट्रिक स्कूटर व्ही 2 मध्ये शक्तिशाली व वॉटरप्रूफ मोटर आहे. या स्कूटरमधील ड्युअल बॅटरी सिस्टमसह तुम्ही पॉवर कमी होण्याची चिंता न करता लांबच्या प्रवासाचा आनंद घेऊ शकता. लिथियम-आयन बॅटरी तीन ते चार तासांमध्ये संपूर्ण चार्ज होते. इलेक्ट्रिक स्कूटर व्ही२ आरामदायी व विश्वसनीय राइड देते. रॅडियण्ट रेड, पेस्टल पीच, सफायर ब्ल्यू, पिस्ता, पर्ल व्हाइट व कोर्बान ब्लॅक या आकर्षक रंगांमध्ये ही स्कूटर उपलब्ध आहे. या स्कूटरची किंमत 77,250 रूपये आहे.
5. हिरो इलेक्ट्रिक फोटॉन
हिरो इलेक्ट्रिक फोटॉनची बॅटरी 5 तासांमध्ये संपूर्ण चार्ज होते. संपूर्ण चार्ज असता 90 किमीची रेंज देते. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एलईडी लाइट्स व टेल लाइट्स, तसेच स्लीक अलॉई व्हील्स आहेत.
इलेक्ट्रिक स्कूटर्स प्रवास करण्यासाठी पर्यावरणास-अनुकूल व सोईस्कर आहे. बाऊंस इन्फिनिटी ई१, हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा सीएक्स, अॅम्पियर मॅग्नस ईएक्स, ओडिसी रेसर लाइट व्ही आणि हिरो इलेक्ट्रिक फोटॉन या सर्व स्कूटर तुम्ही तुमच्या आईला भेट म्हणून देऊ शकता.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI